Home /News /pune /

पुण्यात पुन्हा अवतरला रानगवा, EXCLUSIVE LIVE VIDEO

पुण्यात पुन्हा अवतरला रानगवा, EXCLUSIVE LIVE VIDEO

बावधन परिसरातील हायवेलगत एक रानगवा आढळून आला होता. हायवेच्या बाजूला असलेल्या संरक्षण भीतीजवळ रानगवा फिरताना दिसून आला आहे.

    पुणे, 22 डिसेंबर : पुणे शहरातील कोथरुडमध्ये काही दिवसांपूर्वी एक रानगवा (Indian gaur)आढळून आला होता. दुर्दैवाने या रानगव्याला जेरबंद करण्याआधीच मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा बावधन परिसरात रानगव्याचे दर्शन झाले आहे. बावधन परिसरातील हायवेलगत एक रानगवा आढळून आला होता. हायवेच्या बाजूला असलेल्या संरक्षण भीतीजवळ रानगवा फिरताना दिसून आला आहे. या रानगव्याचा व्हिडीओ आता समोर आला आहे.  रानगवा आढळून  आल्यामुळे एकच धावपळ उडाली आहे. स्थानिकांनी रानगवा आढळल्याची माहिती पोलीस आणि वनविभागाला दिली होती. थोड्यात वेळात वनविभागाची टीम घटनास्थळी पोहोचले आहे. बावधन येथील हायवेलगत असलेल्या हॉटेल शिवप्रसाद समोरील रस्त्यापलीकडे जंगलात हा गवा आलेला आहे. त्याला रेस्क्यू करण्यासाठी प्रशासन, वन विभागाचे कर्मचारी, पोलिस हे घटनास्थळी उपस्थित झाले आहेत. रेस्क्यू करण्याचे काम चालू असून घटनास्थळी स्थानिक नगरसेवक किरण दगडे पाटील हेदेखील बारकाईने लक्ष ठेवून उपस्थित आहेत. रेस्क्यू ऑपरेशनसाठी लोकांचे सहकार्य आवश्यक आहे, त्यामुळे कृपया येथे कोणीही गर्दी करू नये, असं आवाहन नगरसेवक किरण दगडे पाटील यांनी केले आहे. दरम्यान, 9 डिसेंबर रोजी कोथरूड परिसरातल्या महात्मा सोसायटीच्या गल्ली क्रमांक एकमध्ये  गवा आढळून आला होता. सुरुवातीला नागरिकांना ही एखादी गाय असावी अथवा म्हैस असावी असे वाटले. त्यामुळे त्यांनी दुर्लक्ष केले. पण काही काळाने तो गवा असल्याचे लक्षात येताच नागरिकांमध्ये खळबळ उडाली. त्यानंतर घटनास्थळी पोलीस आणि वन विभागाने धाव घेतली. तोपर्यंत गव्याला पाहण्यासाठी पुणेकरांनी तुफान गर्दी केली होती. दिवसभर रेस्क्यू ऑपरेशन राबवल्यानंतरही रानगवा हाती लागला नाही. पण, जमलेल्या लोकांनी गोंधळ घातल्यामुळे रक्तदाब वाढल्यामुळे गव्याने प्राण सोडले. इमारतींच्या जंगलात हरवलेला आणि माणसांना घाबरून जिवाच्या आकांताने धावणाऱ्या गव्याचा अंत झाला होता.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Pune, पुणे, भाजप

    पुढील बातम्या