पुण्यात थरारक घटना, मोकळ्या मैदानात कुख्यात गुंडाला दगडाने ठेचून मारले

पुण्यात थरारक घटना, मोकळ्या मैदानात कुख्यात गुंडाला दगडाने ठेचून मारले

खराडीमधील नैवेद्यम हॉटेल शेजारी मोकळे मैदान आहे. आज सकाळी या मैदानावर एक तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असल्याचे स्थानिकांना आढळून आले.

  • Share this:

पुणे, 05 ऑक्टोबर : लॉकडाउनच्या काळात शांत असलेली सांस्कृतिक नगरी पुण्यात आता गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. शहरातील खराडी परिसरात एका मोकळ्या मैदानात कुख्यात गुंडाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली.

पुणे शहरातील खराडी परिसरात आज पहाटेच्या सुमारास ही घटना  घडली.  शैलेश घाडगे (वय 33) असं खून झालेल्या कुख्यात गुन्हेगाराचे नाव आहे.

कॅन्सरनंतर अशी झाली संजय दत्तची अवस्था, व्हायरल PHOTO पाहून चाहते हैराण

खराडीमधील नैवेद्यम हॉटेल शेजारी मोकळे मैदान आहे. आज सकाळी या मैदानावर एक तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असल्याचे स्थानिकांना आढळून आले. स्थानिकांनी तातडीने याबद्दल चंदननगर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता तो मृतदेह कुख्यात गुंड शैलेश घाडगेचा असल्याचे समजले.  पोलिसांनी शैलेशचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे.

काँग्रेसने पाळला आघाडीचा धर्म अन् शिवसेनेनं निवडणूक जिंकली, भाजपचा पराभव

शैलेश घाडगे हा कुख्यात गुन्हेगार होता. त्याच्यावर वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहे. त्याच्यावर खुनाचा प्रयत्न करण्याचा गंभीर गुन्हा दाखल आहेत. शैलेश घाडगेची कुणी आणि का हत्या केली याबद्दल अद्याप माहिती मिळाली नाही. पूर्ववैमनस्यातून शैलेशची हत्या झाली असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. चंदन नगर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

दीड वर्षांच्या मुलाचा गळा घोटून महिलेचा आत्महत्या

दरमान, पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात विवाहितेनं मुलासह आत्महत्या केल्याची घटना समोर आली. नवरा बायकोची भांडणे टोकाला गेल्याने ही घटना घडली आहे.  आनंदनगर भागात एका विवाहितेने नवऱ्यासोबत झालेल्या भांडणातून स्वतःच्या दीड वर्षाच्या मुलीचा गळा घोटून स्वतः देखील आत्महत्या केली. या घटनेत योगिता अमित बागल (वय 32 ) व काव्य अमित बागल (दीड वर्ष ) या दोघींचा मृत्यू झाला आहे.  आठ दिवसांपूर्वी देखील या दोघात भांडणे झाल्याने सदर विवाहितेने सॅनिटायझर पिऊन व तिच्या लहान मुलीला पाजून आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

Published by: sachin Salve
First published: October 5, 2020, 3:48 PM IST
Tags: pune crime

ताज्या बातम्या