मराठी बातम्या /बातम्या /पुणे /कोरोनाबाधित पतीची रात्री तब्येत खालावली, डॉक्टर पत्नीने AC च्या हवेतून दिला ऑक्सिजन, VIDEO

कोरोनाबाधित पतीची रात्री तब्येत खालावली, डॉक्टर पत्नीने AC च्या हवेतून दिला ऑक्सिजन, VIDEO

एसीच्या थंड हवेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण अधिक असतं. त्यामुळे दाबाने येणारे हवा रुग्णाच्या शरीरात जाऊन....

एसीच्या थंड हवेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण अधिक असतं. त्यामुळे दाबाने येणारे हवा रुग्णाच्या शरीरात जाऊन....

एसीच्या थंड हवेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण अधिक असतं. त्यामुळे दाबाने येणारे हवा रुग्णाच्या शरीरात जाऊन....

पुणे, 27 एप्रिल : पुण्यात (Pune) कोरोनाने थैमान घातले आहे. हॉस्पिटलमध्ये (covid hospital) बेड मिळणे कठीण झाले आहे. घरीच होमक्वारंटाइन असलेल्या पतीची ऑक्सिजन पातळी (oxygen level) कमी झाली त्यामुळे डॉक्टर असलेल्या पत्नीने एसीच्या हवेच्या दाबाने ऑक्सिजन देऊन ऑक्सिजन लेव्हल कायम ठेऊन बरं करण्याचा कौतुकास्पद प्रयोग यशस्वी केला आहे. एसीचा (AC) ऑक्सिजन concentrator सारखा वापर करून सुहास राव यांचा कमी झालेला ऑक्सिजन तातडीने वाढवण्यात डॉक्टर दीपिका राव यांना यश आलं आहे.

पुण्यातल्या चिंचवड स्थित सुहास राव या तरुणाची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. दोन दिवस उपचार केल्यानंतर रात्री अचानक दोन वाजेच्या सुमारास त्याला श्वास घ्यायला त्रास जाणवू लागला आणि ऑक्सिजनची पातळी तपासल्यानंतर ती 87 पर्यंतखाली आल्याचं डॉक्टर असलेल्या पत्नीच्या लक्षात आलं. इतक्या रात्री तातडीने बेड उपलब्ध करणं अशक्य होतं आणि या परिस्थितीत सुहास  यांच्या जीवितासाठी धोक्यात होतं. त्यामुळे दीपिका यांनी तातडीने निर्णय घेत घरातला एसीचा ब्लोअर सुहास यांच्या तोंडासमोर आणला आणि एसीचे हवा त्याला शरीरात घ्यायच्या सूचना दिल्या साधारण 2 ते 3 मिनिटे हा प्रयोग केल्यानंतर सागर याचा ऑक्सीजन पुन्हा पूर्ववत होऊन 92 वर येऊन स्थिरावला.

सकाळपर्यंत सुहास यांना याच एसीच्या मदतीने ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर दिली जाणारी उपचार पद्धती देण्यात डॉक्टर दीपिका यशस्वी ठरल्या. आणि सुहास राव यांचे प्राण वाचले. याच पद्धतीने डॉक्टर दीपिका यांच्या सल्ल्याने आणखी दोन रुग्णांचा ही ऑक्सिजन कायम ठेवण्यात यश आल्यामुळे मोठा कालावधी मिळाला आणि त्यांची वैद्यकीय स्थिती सुधारली आहे.

IPL 2021 : डग आऊटमधून कोड लॅन्ग्वेजने इशारा, KKR ची नवी रणनिती

एसीच्या थंड हवेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण अधिक असतं. त्यामुळे दाबाने येणारे हवा रुग्णाच्या शरीरात जाऊन त्याच्या शरीरातली ऑक्सिजनची पातळी वाढायला मदत होते. याच तंत्राचा उपयोग करून डॉक्टर दीपिका यांनी सुहास राव याचा ऑक्सिजन कायम ठेवण्यात यश मिळवलं आणि परिणामी सुहास यांची प्रकृती सुधारली डॉ. दीपिका यांच्या सांगण्यानुसार गाडीतून रुग्णाला हॉस्पिटलमध्ये नेत असताना सुद्धा ऑक्सिजन ची पातळी कमी होत असल्यास गाडीच्या एसी च्या मदतीने रुग्णाला स्टेबल ठेवता येऊ शकते. सध्याच्या कमी पडणाऱ्या अपुऱ्या यंत्रणांच्या काळात या अशा ताबडतोब उपलब्ध होऊ शकणाऱ्या यंत्रणांचा वापर कुशलतेने केल्यास अनेक जीव वाचवले जाऊ शकतात.

First published:
top videos

    Tags: Pune