मराठी बातम्या /बातम्या /पुणे /Pune News : पुण्यात कोरोनाचा उद्रेक, एकाच दिवसात 6225 रुग्णांची भर

Pune News : पुण्यात कोरोनाचा उद्रेक, एकाच दिवसात 6225 रुग्णांची भर

पुण्यात दिवसभरात 6225 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर 3762 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुण्यात दिवसभरात 6225 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर 3762 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुण्यात दिवसभरात 6225 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर 3762 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुणे, 04 एप्रिल : पुण्यात (Pune) कोरोनाबाधित (Corona) रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे मिनी लॉकडाऊन (Mini Lockdown) लागू करण्यात आला आहे. मिनी लॉकडाऊन लागू झाल्यानंतर कोरोनाबाधित रुग्णांची सर्वाधिक रुग्ण आढळून आली आहे. दिवसभरात 6225 रुग्णांची भर पडली आहे. तर 52 जणांचा मृत्यू झाला आहे.

पुण्यात दिवसभरात 6225 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर 3762 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.  गेल्या 24 तासांत कोरोनाबाधित 52 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, यात 11 रूग्ण हे पुण्याबाहेरील आहे.  901 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 290044 वर पोहोचली आहे. ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 41940 इतकी आहे.  तर आतापर्यंत 5452 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंतच एकूण 242652 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज 17774 नमुन्यांची (स्वॅब) तपासणी केली आहे.

राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 57 हजारांवर!

राज्य सरकारच्या वतीने गेल्या 24 तासातील कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. आज 27,508 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. तर राज्यात आजपर्यंत एकूण 25,22,823 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 83. 8% वर पोहोचला आहे.

गर्लफ्रेंडने नशेत असलेल्या बॉयफ्रेंडचा Private Part कापून टॉयलेटमध्ये केला फ्लश

आज राज्यात 57,074 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. गेल्या 24 तासांत 222 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.86% एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2,05,40,111 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 30,10,597 (14.66 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.  सध्या राज्यात 22,05,899 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 19,711 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात एकूण 4,30,503 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

शनिवारी राज्यात 49 हजार कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर आता थेट 50 हजार कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा पार झाला आहे.

First published: