Home /News /pune /

पुण्यात remdesivir injection साठी नियंत्रण कक्ष, 'या' हेल्पलाईनवर करता येईल मागणी

पुण्यात remdesivir injection साठी नियंत्रण कक्ष, 'या' हेल्पलाईनवर करता येईल मागणी

रुग्णांच्या नातेवाईकांची वणवण थांबावी आणि रेमडेसीवीरचा काळाबाजार होऊ नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला असून, या कक्षासाठी स्वतंत्र हेल्पलाईनही सुरू केली आहे.

पुणे, 11 एप्रिल : पुण्यात रेमडेसीवीर इंजेक्शन (remdesivir injection) रूग्णांना संबंधित हॉस्पिटलमध्येच मिळावे यासाठी स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी त्यासंबंधीचे आदेश दिले. रुग्णांच्या नातेवाईकांची वणवण थांबावी आणि रेमडेसीवीरचा काळाबाजार होऊ नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला असून, या कक्षासाठी स्वतंत्र हेल्पलाईनही सुरू केली आहे. वाचा - गुजरातमध्ये कोरोनामुळे स्मशानभूमीत रांग;अंत्यसंस्कारासाठी पैसे मागितल्याचा आरोप संपूर्ण राज्यात आणि विशेषतः पुण्यात गेल्या काही दिवसांपासून रेमडेसीवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला होता. काही ठिकाणी या इंजेक्शनचा काळाबाजर पाहायला मिळाला. तर अनेकठिकाणी जास्तीचे पैसे मोजूनही इंजेक्शन मिळत नसल्याचं चित्र होतं. पुण्यात काळाबाजार करणाऱ्यांचा पर्दाफाशही करण्यात आला. त्यामुळे या परिस्थितीवर नियंत्रण मिळावे आणि रेमडेसीवीरच्या पुरवठ्याचे नियोजन करता यावे यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी नियंत्रण कक्ष स्थापण्याचे आदेश दिले. फक्त आदेश देऊन न थांबता जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने कलेक्टर ऑफिस आवारात यासाठी स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापन देखिल केला आहे. वाचा - गेल्यावर्षी अशीच दिसली होती मायानगरी! मुंबईत कसं होतंय Weekend Lockdownचं पालन? नवीन स्थापन करण्यात आलेल्या या कक्षामधूनच रेमडेसीवीरच्या दैनंदिन उपलब्धतेचा (स्टॉक) हिशेब ठेवला जाईल. त्यामुळे रूग्णांच्या नातेवाईकांना एका इंजेक्शनसााठी एका मेडिकलमधून दुसऱ्या मेडिकलमध्ये वणवण फिरावं लागणार नाही. तसंच जे हॉस्पिटल रेमडेसीवीर उपलब्ध करून देणार नाहीत त्यांच्यावर पॅन्डॅमिक अँक्टनुसार कारवाई केली जाईल, अशा इशाराही जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिला आहे. हेल्पलाईनही सुरू रेमडेसीवीरच्या नियोजनासाठी नियंत्रण कक्ष सुरू करण्याबरोबरच जिल्हाधिकाऱ्यांनी हेल्पलाईन आणि टोल फ्री क्रमांकही सुरू केले आहेत. ज्यांनी रेमडेसीवीर इंजेक्शनची आवश्यकता असेल ते 020-26123371 हेल्पलाईनवर  किंवा 1077 या टोल फ्री क्रमांकावरही संपर्क करू शकतील. त्यांना मदत केली जाणारेय. हा नियंत्रण कक्ष 31 मेपर्यंत सुरू राहील असं सांगण्यात आलं आहे.
Published by:News18 Desk
First published:

Tags: Coronavirus, Pune

पुढील बातम्या