पिंपरी चिंचवड, 29 मार्च : पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरातील भाजपच्या नगरसेविका करुणा चिंचवडे (Karuna Chinchwade) यांचा मुलगा प्रसन्ना चिंचवडे (Prasanna Chinchwade) याचा गोळी लागल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान, प्रसन्नाने स्वतः गोळी झाडून आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलीस उपायुक्त मंचक इप्पर यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री 9 च्या सुमारास ही घटना घडली. होळीच्या निमित्ताने सर्व चिंचवडे कुटुंब घरीच होते. प्रसन्ना आपल्या खोलीत होता. काही वेळानंतर अचानक प्रसन्नाच्या खोलीमधून गोळी झाडल्याचा आवाज आला. घरात गोळी झाडण्याचा आवाज आल्यामुळे एकच गोंधळ उडाला. घरातील सदस्यांनी प्रसन्नाच्या खोलीकडे धाव घेतली. प्रसन्नाच्या खोलीत प्रवेश केला असता त्याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता.
क्युट पांडा; हुबेहुब माणसासारखं खातो गाजर, VIDEO पाहून म्हणाल कमाल आहे!
प्रसन्ना उचलेल्या टोकाच्या पावलामुळे एकच खळबळ उडाली. या घटनेबद्दल पोलिसांना तातडीने माहिती देण्यात आली. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतील. प्रसन्नाला लागलेली गोळी ही त्याचे वडील शेखर यांच्याच बंदुकीतील असून, प्रसन्नाने ती स्वतःवर झाडून घेतली असल्याचे दिसत आहे. त्यामुळे हा प्रकार आत्महत्येचा असावा असा प्राथमिक अंदाज आहे.
प्रसन्नाला तातडीने नजीकच्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले होते. पण डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. पोलिसांनी प्रसन्नाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला होता. त्यानंतर रविवारी रात्रीच प्रसन्नावर अंत्यसंस्कार करण्यात आले असून या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मुंगुसाचा अभिनय तर माणसालाही लाजवेल! मजेदार व्हायरल VIDEO पाहून थक्क व्हाल
प्रसन्नाने स्वत: वर गोळी का झाडून घेतली, घटनेपूर्वी तो कुणाशी बोलला होता, त्याला कुणाचे फोन कॉल्स आले होते आणि इतर बाबी तपासल्या जाणार असल्याचंही इप्पर म्हणाले. त्या दृष्टीने तपास सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.