आता पाण्याची भीतीच वाटणार नाही, पुण्याच्या अवलियाने शोधला नवा फंडा!

आता पाण्याची भीतीच वाटणार नाही, पुण्याच्या अवलियाने शोधला नवा फंडा!

पाणी हा पंच महाभूतांमधील महत्वाचा घटक. याच पाण्याला आपण जीवन असंही म्हणतो. पण जेव्हा एखाद्याला पोहोता येत नाही तेव्हा मात्र वेळप्रसंगी त्याला मृत्यूचा सामना करावा लागतो.

  • Share this:

रायचंद शिंदे, प्रतिनिधी

पुणे, 07 डिसेंबर : अनेकांना पाण्यापासून भीती वाटत असते. मात्र, पुणे जिल्ह्यातील चाकण येथील एका अवलियाने या भितीवरच विजय मिळवला आहे. त्यामुळे ज्यांना पाण्याची भिती वाटते त्यांना पाण्यात टाकून जरी दिलं तरी ते पाण्यात उभे राहू शकतील, झोपतील, बरं इतकंच नाही तर योगासनेदेखील करतील. पाहूयात पाण्यासोबत दोस्ती केलेल्या या अवलियाचा एक विशेष रिपोर्ट.

पाणी हा पंच महाभूतांमधील महत्वाचा घटक. याच पाण्याला आपण जीवन असंही म्हणतो. पण जेव्हा एखाद्याला पोहोता येत नाही तेव्हा मात्र वेळप्रसंगी त्याला मृत्यूचा सामना करावा लागतो. पाण्यात हातपाय हलवून पोहणारे अनेकजण आपण पाहतो. पण हातपाय ना हलवता कितीही काळ पाण्यात राहणे मात्र अशक्य गोष्ट आहे. पण ही किमया साध्य केलीय चाकण, तालुका खेडमधील प्रसिद्ध जलयोगशिक्षक बापूसाहेब सोनवणे यांनी.

मोठी बातमी - महाराष्ट्रात हैदराबाद घटनेची पुनरावृत्ती, बलात्कारानंतर महिलेची हत्या

बापूसाहेब सोनवणे जमिनीवर तर योगासने करतातच. पण पाण्यात ही लीलया योगासनं करतात. मग पद्मासन, शवासन, उत्कटासन, मत्स्यसन, उष्ट्रासन, धनुरासंन, अर्धाचक्रासंन, पाण्यात सरळ उभे राहणे, चालत जाणे, राष्ट्रगीत म्हणणे असे प्रकारही ते सहज करतात. त्यांचे शिष्यही यात तरबेज होत आहेत.

इतर बातम्या - रिक्षा चालकाने केला चिमुकलीवर बलात्कार, रक्ताने माखलेल्या पीडितेवर उपचार सुरू

विशेष म्हणजे याबाबत आवड असणाऱ्यांना ही आसनं ते विनामूल्य शिकवतात. पाणी म्हणजे काय हे लोकांनी समजून घेतलं तर ज्या आजारांवर जमिनीवरच्या योगासनांनी फायदे होतात. तेच पाण्यात केले तर अधिक फायदे होतील. तसेच दमछाक होऊन जे मृत्यू होतात ते कमी होतील. याबाबत पाण्याविषयी लोकजागृती करून जास्तीत जास्त लोकांना वाचवणे आपला उद्देश असल्याचे ते सांगतात.

इतर बातम्या - मुंबईत मद्यधुंद कार चालकाच्या धडकेत तरुणीचा नाहक बळी, संतप्त नातेवाईकांचं आंदोलन

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 7, 2019 03:53 PM IST

ताज्या बातम्या