रुग्ण फिरताय वणवण अन् शहरातच 80 बेड होते धूळखात पडून, पुण्यातील प्रकार

रुग्ण फिरताय वणवण अन् शहरातच 80 बेड होते धूळखात पडून, पुण्यातील प्रकार

एकीकडे कोरोना (corona) रुग्णांची संख्या वाढत असताना रुग्णांना बेड उपलब्ध होत नाहीत. तर दुसरीकडे ...

  • Share this:

पुणे, 19 एप्रिल : एकीकडे कोरोना (corona) रुग्णांची संख्या वाढत असताना रुग्णांना बेड उपलब्ध होत नाहीत. तर दुसरीकडे पुणे (Pune) जिल्ह्यातील शिरुर (Shirur) शहरातील सी टी बोरा काॅलेजच्या बाॅईज हाॅस्टेलमध्ये जवळपास एक महिन्यापासून 80 बेड अक्षरशः धुळखात पडलेले आहेत. याचा पोलखोल भाजप (BJP) उद्योग आघाडीचे पुणे जिल्हा (ग्रामीण) जिल्हाध्यक्ष संजय शिवाजी पाचंगे यांनी केला.

आज दुपारी संजय पाचंगे यांनी शिरुर शहरातील कोविड-19 केअर सेंटर सीटी बोरा काॅलेजला भेट देत हा हा प्रकार उघड केला, यावेळी बाजार समितीचे संचालक आबासाहेब सोनवणे व भाजप युवा मोर्चाचे शिरुर शहर अध्यक्ष उमेश शेळके उपस्थित होते.

भररस्त्यात डोकं टेकलं, हात जोडले; सलमानचं नाव घेत ढसाढसा रडू लागली राखी सावंत

एकीकडे कोविड रुग्णांची संख्या वाढत असताना रुग्णांना बेड उपलब्ध होत नाहीत. तर दुसरीकडे मात्र  शासनाकडून आलेला निधी हडप करण्याचा उद्देश ठेवून कोविड केअर सेंटरसाठी नवीन जागा शोधल्या जात आहेत असल्याचा आरोप पाचंगे यांनी केला आहे. कोविड-19 पेशंट ना वार्‍यावर सोडून फक्त शासनानाचा आलेला निधी खर्च झाल्याचे दाखवण्यासाठी प्रशासन आणि राज्यकर्ते मग्न आहेत, असंही त्यानी म्हटलं आहे.

शिरूर तालुक्यात रुग्ण वाढ होत असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता लोकप्रतिनिधी व प्रशासनाने तालुक्यातील कोविड रुग्णांसाठी तात्काळ ऑक्सिजन व व्हेंटीलेटरची सुविधा उपलब्ध करून द्यावी नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये अन्यथा बेड न मिळाल्यास कोविड रुग्णांना तहसीलदार व लोकप्रतिनिधींच्या दारात नेऊन ठेवणार असल्याचा इशारा संजय पाचंगे यांनी दिला आहे.

Explainer : देशात अचानक का निर्माण झाला ऑक्सिजनचा तुटवडा? त्यावर उपाय काय?

कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध होऊनही शिरूर तालुक्यातील कोविड रुग्णांना वार्‍यावर सोडणाऱ्या तालुका, जिल्हा प्रशासनाचा व लोकप्रतिनिधींचा त्यांनी जाहीर निषेध केला आहे. तर पाचंगे यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिरूर तालुक्यातील कोविड 19 रुग्णांची एका दिवसाची संख्या 400 च्या उंबरठ्यावर असून एकूण अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या  सरासरी 3000 च्या पुढे असण्याची शक्यता व्यक्त करतानाच मृतांची वाढती संख्या ही सर्वांना चिंतेचा विषय ठरत आहे.

Published by: sachin Salve
First published: April 19, 2021, 11:38 PM IST
Tags: pune

ताज्या बातम्या