मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

कोरोनाचं विघ्न पाहता विघ्नहर्त्यासाठीच घेतला मोठा निर्णय, पुण्याच्या मंडळांचं कौतुकास्पद पाऊल

कोरोनाचं विघ्न पाहता विघ्नहर्त्यासाठीच घेतला मोठा निर्णय, पुण्याच्या मंडळांचं कौतुकास्पद पाऊल

यंदाच्या गणेशोत्सावावर कोरोनाचं सावट असणार आहे. अशात पुण्यातील गणेश मंडळांनी मोठा निर्णय घेतला आहे.

यंदाच्या गणेशोत्सावावर कोरोनाचं सावट असणार आहे. अशात पुण्यातील गणेश मंडळांनी मोठा निर्णय घेतला आहे.

यंदाच्या गणेशोत्सावावर कोरोनाचं सावट असणार आहे. अशात पुण्यातील गणेश मंडळांनी मोठा निर्णय घेतला आहे.

पुणे, 08 ऑगस्ट : पूर्ण जगात कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. देशात सर्वाधिक प्रादुर्भाव महाराष्ट्रात आहे. त्या मुंबई आणि पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सगळ्यात जास्त आहे. गणेशोत्सव जवळ आला आहे. मात्र, यंदाच्या गणेशोत्सावावर कोरोनाचं सावट असणार आहे. अशात पुण्यातील गणेश मंडळांनी मोठा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातल्या 50 गणेश मंडळांनी एकत्र येत यंदा गणेशोत्सवात मांडव न घालण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भावात पुण्याच्या गणेश मंडळांनी सामाजिक भान राखणारी मोठी भूमिका घेतली आहे. यापूर्वी प्रशासकीय पातळीवर झालेल्या बैठकांमध्ये गणेश मूर्तीच्या उंचीवर आणि उत्सवावर काही अटी घालून उत्सव साजरा करण्याच आवाहन करण्यात आलं होतं. या आवाहनाला प्रतिसाद देत पुण्यातल्या सुमारे 50 मोठ्या गणेश मंडळांनी एकत्र येत रस्त्यावर मांडव न टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

तर त्याऐवजी वर्षभर ज्या छोट्या शेडमध्ये मूर्ती ठेवण्यात येतात त्याच ठिकाणी छोट्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाईल. मंडळाचे पाच कार्यकर्ते रोजची आरती , प्रसाद , पूजा या गोष्टी करतील. महत्वाचं म्हणजे जगभरात पुण्यातल्या गणेश उत्सवातील मिरवणुका या आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो त्या मिरवणुका ही रद्द करण्यात आल्यात. यावेळचा गणेशोत्सव हा इंटरनेटचा वापर करून लाईव्ह करण्याचा निर्णय ही या मंडळांनी घेतला आहे.

पुण्यात धक्कादायक प्रकार, रेणुकामाता मंदिराचा कळस गेला चोरीला

काय आहेत गणेशोत्सवाच्या गाईडलाईन...

-घरगुती गणेशमूर्तींचे आगमन मिरवणुकीच्या स्वरूपाचे नसावे. आगमनासाठी जास्तीत-जास्त 5 व्यक्तिंचा समूह असावा. आगमनप्रसंगी मास्क/शिल्ड, सॅनिटायझर, सामाजिक अंतर इत्यादी स्वसंरक्षणाची साधने काटेकोरपणे वापरण्यात यावीत.

-घरगुती गणेशोत्सवासाठीची मूर्ती शक्यतो शाडूची असावी व या मूर्तीची उंची दोन फूटापेक्षा जास्त असू नये किंवा शक्य असल्यास यावर्षी पारंपरिक शाडूच्या गणेशमूर्तीऐवजी घरात असलेल्या धातू / संगमरवर आदी मूर्तींचे पूजन करावे. जेणेकरुन, आगमन / विसर्जनासाठी गर्दीत जाणे टाळून स्वतःचे / कुटुंबियांचे ‘कोविड-19’ साथ रोगापासून संरक्षण करणे शक्य होईल.

-घरगुती गणेशमूर्तींची स्थापना करणा-या भाविकांनी दर्शनास येणा-या व्यक्तिंना मास्क परिधान करण्याचा आग्रह धरावा. तसेच त्यांच्यासाठी सॅनिटायझरची व्यवस्थाा करावी.

-भाविकांनी स्थापन केलेल्या गणेशमूर्तीचे विसर्जन पुढे ढकलणे शक्य असल्यास या मूर्तीचे विसर्जन माघी गणेशोत्सव किंवा 2021 च्या भाद्रपद महिन्यात पुढील वर्षीच्या विसर्जनाच्या वेळीदेखील करता येणे शक्य आहे. (त्यासाठी मूर्तीचे पावित्र्य राखणेसाठी पवित्र वस्त्रात गुंडाळून घरीच मूर्ती जतन करुन ठेवता येईल)

-गणेशमूर्ती शाडूची किंवा पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे.

राष्ट्रवादी आमदारांच्या लहान भावाचा भीषण अपघात, ट्रकच्या धडकेत जागीच मृत्यू

-गणेशमूर्तींचे विसर्जन घरच्या-घरी करणे शक्य नसल्यास नजिकच्या कृत्रिम विसर्जनस्थळी मूर्तीचे विसर्जन करावे.

-विसर्जनाच्या वेळी पाच व्यक्तींपेक्षा अधिक व्यक्ती असू नयेत.

-नैसर्गिक विसर्जन स्थळांवर विसर्जनासाठी जाणे शक्यतो टाळावे.

-घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन करताना, संपूर्ण चाळीतील / इमारतीतील सर्व घरगुती गणेशमूर्ती विसर्जनाची मिरवणूक एकत्रितरित्या काढू नये.

-विसर्जनाच्या पारंपरिक पद्धतीत विसर्जनस्थळी होणारी आरती घरीच करुन विसर्जनस्थळी कमीत-कमी वेळ थांबावे. विसर्जनप्रसंगी मास्क / शिल्ड इत्या्दी स्वसंरक्षणाची साधने काटेकोररित्या वापरावीत.

-शक्यतो लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जन स्थळी जावू नये.

-बृहन्मुंबई महानगरपालिका / पोलिस प्रशासन यांनी घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.

-घर / इमारत गणेशोत्सव कालावधीत प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केल्यास प्रतिबंधित क्षेत्र नियमांचे पालन करावे.

-उत्सव प्रसंगी अशी कोणतीही कृती करु नये, जेणेकरुन कोरोना विषाणुचा फैलाव होईल. अन्यथा अशा व्यक्ती साथरोग कायदा 1897, आपत्ती निवारण कायदा 2005 व भारतीय दंड संहिता 1860 कायद्यान्वये कारवाईस पात्र राहतील.

First published:

Tags: Corona, Coronavirus, Pune, Pune news