पुणे, 22 जुलै : पुण्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. रोज कोरोनाच्या नव्या आकड्यांची नोंद होत आहे. अशात पुणे जिल्ह्याचं रक्षण करणाऱ्या आणि अहोरात्र काम करणाऱ्या पोलीस दलात कोरोनाने मोठ्या प्रमाणात शिरकाव केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे पोलीस दलात आतापर्यंत 300 कर्मचारी कोरोना बाधीत झाले आहे. 300 पैकी 97 जणांवर उपचार सुरू तर इतर सर्व कोरोना मुक्त झाले असल्याची माहिती आहे.
पुण्यात आत्तापर्यंत 3 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे लोकांच्या थेट संपर्कात येणाऱ्या पोलिसांना पीपीई किट देण्यात येणार आहे. पुणे पोलीस दलात 3 हजार पीपीई किट वाटणार आहेत. वैष्णवी महिला उन्नती संस्थेमार्फत पुणे पोलिसांना 3 हजार पीपीई किट आणि मास्कचे मोफत वाटप करण्यात येणार आहे.
दरम्यान, पुण्याचा अनेक भाग कंटेनमेंट भाग म्हणून घोषित करण्यात आला आहे. पुण्यात दत्तवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे हे लॉकडाऊनमध्ये चक्क सायकलवरून पेट्रोलिंग करत आहेत.
राष्ट्रवादी आणि शिवसेना काँग्रेस पक्षावर नाराज, मोठा निर्णय घेण्याची शक्यता
पोलीस निरीक्षक देविदास घेवारे यांच्या अंतर्गत तब्बल 14 कंटेंटमेंट झोन असल्याने बहुतांश गल्ली बोळा या त्यांच्याच कर्मचाऱ्यांनी पत्रे आणि बांबू लावून सील करून टाकल्या आहेत. म्हणून देविदास घेवारे यांनी स्वत:च सायकलवर पेट्रोलिंग सुरू केलं आहे. स्वत: पोलीस इंचार्जच सायकल फिरून रहिवाशांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन करत असल्याचं म्हटल्यावर नागरिकही या अनोख्या पोलिसिंगला उत्तम प्रतिसाद देत असल्याचं देविदास घेवारे यांनी सांगितलं आहे.
अनलॉकनंतर आता पुन्हा लॉकडाऊन होणार का? राजेश टोपेंनी दिली महत्त्वाची माहिती
पुण्यातून धक्कादायक बातमी, अलका चौकात आंदोलन करणाऱ्या 'त्या' रुग्णाचा मृत्यू
पुण्यात काय आहे कोरोनाची स्थिती?
खरंतर, पुण्यातही कोरोनाचा कहर सुरूच आहे. अशात रुग्णांना बेड मिळत नसल्याच्या अनेक तक्रारीही समोर आल्या आहेत. दरम्यान, Unlock नंतर पुण्यात Corona रुग्णांच्या संख्येत तिपटीने वाढ झाली. एक आठवड्याच्या कडक लॉकडाऊननंतही रुग्णवाढ कमी झालेली नाही.
21 जुलैच्या आकडेवारीनुसार पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 40715 झाली आहे. 24 तासांतच 1512 रुग्णांची वाढ झाली आहे. पुण्यात 24 तासांत 30 करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू नोंदला गेला. 616 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात 99 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार आहेत.