मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

पुण्यात कोविड नियम धाब्यावर बसवणाऱ्या NCPच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल

पुण्यात कोविड नियम धाब्यावर बसवणाऱ्या NCPच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल

Pune NCP Workers Gathering: शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात कोरोना नियमांचं उल्लंघन करण्यात आलं होतं. या प्रकरणी आता कारवाई करण्यात आली आहे.

Pune NCP Workers Gathering: शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात कोरोना नियमांचं उल्लंघन करण्यात आलं होतं. या प्रकरणी आता कारवाई करण्यात आली आहे.

Pune NCP Workers Gathering: शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात कोरोना नियमांचं उल्लंघन करण्यात आलं होतं. या प्रकरणी आता कारवाई करण्यात आली आहे.

  • Published by:  Pooja Vichare

पुणे, 20 जून: पुण्यात (Pune) शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नव्या या कार्यालयाचे उद्घाटन पार पडले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी (NCP workers gathering) गर्दी केली होती. या कार्यक्रमात कोरोना नियमांचे उल्लंघन करण्यात आलं होतं. याची दखल आता पोलिसांनी घेतली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रदीप देशमुख, माजी नगरसेवक निलेश निकम, सरचिटणीस रोहन पायगुडे माजी नगरसेवक बाळासाहेब बोडके यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच यांच्यासह 100 ते 150 महिला आणि पुरुष पदाधिकाऱ्यां विरोधातही गुन्हा दाखल केला आहे. पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे शहरात शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन अजित पवारांच्या (Ajit Pawar) हस्ते करण्यात आलं. अजित पवार (Ajit Pawar) कार्यक्रमस्थळी पोहोचण्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयाबाहेर तुफान गर्दी केली होती. कोविड प्रतिबंधक नियमांचे सर्रास उल्लंघन यावेळी पहायला मिळालं. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी काल सकाळीच आपल्या कार्यकर्त्यांना कार्यक्रमस्थळी गर्दी न करण्याचे आवाहन केले होते. मात्र, असे असतानाही कार्यक्रमस्थळावर मोठ्या संख्येत कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा- मुंबई लोकलबाबत महापौर किशोरी पेडणेकरांचं महत्त्वाचं विधान

अजित पवार देखील या कार्यक्रमात सहभागी झाल्याने त्यांच्या उपस्थितीतच अशाप्रकारे कोरोना नियमांचे उल्लंघन झाल्याने एक प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि अजित पवार यांच्यावर विरोधकांनी टीका केली होती.

अजित पवारांकडून दिलगिरी व्यक्त

अजित पवारांनी ही गर्दी पाहून दिलगिरी व्यक्त केली आहे. अजित पवार म्हणाले, सकाळी सात वाजता उद्घाटन करायला हवं होत म्हणजे कमी लोक आले असते. गाडीतून उतरताना एकदा मनात आल होत निघून जावं, पण कार्यकर्त्यांना वाईट वाटेल. धरता ही येत नाही आणि सोडता ही येत नाही अशी माझी अवस्था, मी दिलगिरी व्यक्त करतो.

First published:

Tags: Ajit pawar, NCP, Pune