पुणे, 3 जून: पुण्यातील (Pune City) विकासकामांसाठी रस्ते मोठ्या प्रमाणात खोदण्यात आले आहेत. कुठे पाईपलाईन टाकण्यासाठी तर कुठे इतर कामासाठी रस्ते खोदले आहेत. या कामांमुळे रस्त्यांवर वाहतूक कोंडी (Traffic Jam) सुद्धा होताना दिसत आहे. इतकेच नाही तर पावसाळ्यापूर्वी करण्यात येत असलेल्या या कामांत मोठा भ्रष्टाचार (Corruption) झाल्याचाही आरोप राष्ट्रवादीने केला आहे. यावरुनच आज पुणे मनपासमोर राष्ट्रवादीकडून आंदोलन (NCP protest) करण्यात आलं. मात्र, या आंदोलनात कोविड नियमांचं सर्रास उल्लंघन झाल्याचं पहायला मिळालं.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर (Rupali Chakankar), पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या उपस्थित हे आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केल्याचं पहायला मिळालं. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ते आणि नेत्यांत सोशल डिस्टंन्सिंग अजिबात नव्हते. तर काहींच्या चेहऱ्यावर मास्कही नव्हता. यामुळे आता राजकीय पुढारी, कार्यकर्त्यांवर कारवाई होणार की नाही? हा प्रश्न उपस्थित होत आहे.
पुण्यात आंदोलनाला राष्ट्रवादीची तोबा गर्दी; कोविड नियमांचं सर्रास उल्लंघन pic.twitter.com/gewMSk0FiJ
— News18Lokmat (@News18lokmat) June 3, 2021
पुण्यात लॉकडाऊन तर उघडलं, पण रस्ते खोदकामामुळे वाहतुकीची कोंडी
पुण्यातील कोरोना बाधितांची संख्या कमी झाल्याने आता मनपाकडून सकाळी 7 ते दुपारी 2 या काळात दुकाने उघडण्यास परवानगी दिली आहे. यामुळे आता रस्त्यावर वर्दळ वाढली आहे. मात्र, सर्वत्र रस्त्यांची कामे सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याचं पहायला मिळत आहे. यासोबतच मनपा कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा या मागणीसाठीही राष्ट्रवादीने आंदोलन केले.
पुण्यातील शनिवार पेठ, सदाशिव पेठ, लक्ष्मीरोड, कुमठेकर रोड, बाजीराव रोड, अप्पा बळवंत चौक या परिसरात पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू असल्याने रस्ते खोदून ठेवले आहेत. पावसाळा तोंडावर आला असताना अद्यापही कामे पूर्ण न झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.