Home /News /pune /

पुण्यात मध्यरात्री खुनाचा थरार, कोयत्याने सपासप वार करून 21 वर्षीय तरुणाची हत्या

पुण्यात मध्यरात्री खुनाचा थरार, कोयत्याने सपासप वार करून 21 वर्षीय तरुणाची हत्या

कोयत्याने वार केल्यानंतर तरुणावर गोळी झाडण्यात आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

    पुणे, 13 जुलै : पुण्यातील दत्तवाडीत मध्यरात्री खुनाचा थरार रंगला. शाहू वसाहतीत गोळ्या झाडून आणि कोयत्याने सपासप वारकरून एका तरुणाचा खून करण्यात आला आहे. अमित मिलिंद सरोदे (वय 21, रा. जनता वसाहत, गल्ली नं. 15) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात आदर्श ननावरे, बोंबल्या आणि यशवंत कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री अमित हा येथील शाहू वसाहतीसमोरील बालाजी होलसेलच्या जवळ थांबला असता अचानक आलेल्या तिघांनी त्याच्यावर हल्ला केला. कोयत्याने वार केल्यानंतर तरुणावर गोळी झाडण्यात आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. आरोपींना अमित सरोदे याचा खून नेमका कोणत्या कारणामुळे केला, याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. दत्तवाडी पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. हेही वाचा - मुलाच्या मृत्यूचा बापानं घेतला बदला! महिलेचं शीर घेऊन पोहोचला पोलीस ठाण्यातदरम्यान, अनलॉक प्रक्रियेनंतर पुण्यात खूनाच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. दोन दिवसांपूर्वीच पुण्यात मुळशी पॅटर्न सारखा थरार पाहायला मिळाला. घरात घुसून टोळक्यांनी अट्टल गुन्हेगार पप्पू पडवळ याची निर्घृण हत्या केली. कोयत्याने सपासप वार करून पप्पू पडवळला ठार मारण्यात आलं आहे. घनश्याम उर्फ पप्पू पडवळ (रा. कोंढवा) असं खून झालेल्या गुन्हेगाराचं नाव आहे. पप्पू पडवळवर त्याच्यावर अनेक वेगवेगळे प्रकारचे गुन्हे दाखल होते.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Pune crime news, Pune news, Pune police

    पुढील बातम्या