पुणे, 26 सप्टेंबर : राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. मुंबई आणि पुण्यात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. पण गेल्या सहा महिन्यांपासून ठप्प झालेल्या बाजारपेठा आता पूर्ववत सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे पुणे महापालिकेनं पुणेकरांना आणखी एक महत्त्वाचा दिलासा दिला आहे.
पुण्यात लॉकडाउनमुळे गेल्या सहा महिन्यांपासून ठप्प झालेला हॉटेल्स व्यवसाय आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे. त्यातच पुणे महानगरपालिकेनं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पुण्यात पार्सल सेवेसाठी हॉटेल्स आता रात्री 10 पर्यंत खुली राहणार आहे. त्यामुळे पुणेकरांना आता रात्री उशिरापर्यंत पार्सल्स घरी मागवता येणार आहे.
पुणेकरांनो सावधान! 'हे' आहेत कोरोनाचे 5 नवे हॉटस्पॉट
पुण्यात याआधी हॉटेल्समधून पार्सल जर मागवायचे असेल तर संध्याकाळी 7 पर्यंत वेळ देण्यात आला होता. पण, आता संध्याकाळनंतर हॉटेलमधून पार्सल मागवण्याचे प्रमाण जास्त वाढले आहे. पण वेळीच्या मर्यादा असल्यामुळे ग्राहकांची गैरसोय होत होती. त्यामुळे पुणे पालिकेनं आता रात्री 10 वाजेपर्यंत हॉटेल्समधून पार्सल मागवण्यास परवानगी दिली आहे.
पु्ण्यात कोरोनाची परिस्थिती पाहता अनेक अटी शर्थींसह अनलॉकची प्रक्रिया सुरू केली आहे. कोरोनाच्या वातावरणात पुणेकर फारसे बाहेरचं खाणं टाळत आहे. त्यामुळे केवळ 20 टक्केच व्यवसाय होत असल्यामुळे हॉटेल चालक अडचणीत सापडले आहे.
हॉटेल व्यवसायाला परत उभारणी देण्यासाठी पुणे पालिकेनं आता वेळेत वाढ केली आहे. त्यामुळे हॉटेल्स आणि ग्राहकांना काहीसा दिलासा मिळणार आहे.
राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले
दरम्यान, कोरोना रुग्णांचं बरे होण्याचं प्रमाण शुक्रवारी पुन्हा वाढलं आहे. शुक्रवारपर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार, 19 हजार 592 रुग्ण बरे झाले. तर 17 हजार 794 नवे रुग्ण आढलले आहेत. तर 416 जणांचा मृत्यू झाला. रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 76 टक्यावर गेलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली होती. राज्यात गुरूवारी दिवसभरात कोरोनानं 459 जणांचा बळी घेतला होता. तर 19 हजार 164 नवे रुग्ण आढळून आले होते. तर 17 हजार 184 रुग्ण बरे होऊन घरी गेले होते.
नवी मुंबई पालिकेची हॉस्पिटल्सवर कारवाई, कोरोना परिस्थितीत होते धक्कादायक प्रकार
कोरोना व्हायरसपासून (Coronavirus) बचावासाठी जगभरात विविध उपाय केले जात आहेत. जगभरात कोरोनाच्या लशीवर (Corona vaccine) संशोधन सुरू आहे. पण लस येईपर्यंत सर्वात प्रभावी उपाय म्हणून सॅनिटायझर, मास्क, प्लॅस्टिक शिल्डचा वापर आणि सोशल डिस्टंसिंगचा अवलंब करण्यात येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.