धक्कादायक, तुकाराम मुंढेंनी ठेकेदाराला ठोठावलेला दंड, पुणे पालिका करणार परत!

महालक्ष्मी ट्रान्सपोर्टचे मालक सातव हे अजित पवारांचे निकटवर्तीय आहे. त्यामुळे पालिकेच्या या निर्णयामुळे राजकीय चर्चांना उधाण आहे.

महालक्ष्मी ट्रान्सपोर्टचे मालक सातव हे अजित पवारांचे निकटवर्तीय आहे. त्यामुळे पालिकेच्या या निर्णयामुळे राजकीय चर्चांना उधाण आहे.

  • Share this:
पुणे, 23 जून: कर्तव्यकठोर प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंढे (Tukaram Kundhe) पुणे महापालिकेत (Pune municipal corporation) कार्यरत असताना पीएमपीएमएलच्या (PMPML) ठेकदारांकडून दंड वसूल केला होता. तो दंड आता परत देण्याचा निर्णय पुणे पालिकेनं घेतला आहे. त्यामुळे पुणे पालिकेत एकच खळबळ उडाली आहे. तुकाराम मुंढे हे पीएमपीएमएल मुख्य संचालक असताना कारवाई केली होती. महालक्ष्मी ट्रान्सपोर्टच्या बसेस पीएमपीकडे भाड्याने आहेत. महालक्ष्मी ट्रान्सपोर्टने कराराच्या अटी आणि शर्थीचं उल्लंघन केलं होतं. अटी शर्थीचं उल्लंघन केल्याप्रकरणी दंड वसूल करण्यात आला होता. आज पुणे पालिकेत विद्यमान सीएमडी राजेंद्र जगताप यांना याबद्दल प्रस्ताव मांडला होता.महालक्ष्मी ट्रान्सपोर्टला जो दंड ठोठावण्यात आला होता. परत देण्यात यावा, अशी माणगी महापालिकेकडे करण्यात आली होती. या प्रस्तावाला आज मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे या ठेकेदाराला आता महापालिका 14 कोटी रुपये परत देणार आहे. ठाकरे सरकारमध्ये नवा वाद, या निर्णयावर छगन भुजबळ संतापले! विशेष म्हणजे, महालक्ष्मी ट्रान्सपोर्टचे मालक सातव हे अजित पवारांचे निकटवर्तीय आहे. त्यामुळे पालिकेच्या या निर्णयामुळे राजकीय चर्चांना उधाण आहे. पत्नी या गोष्टी आपल्या पतीला सहजपणे सांगू शकत नाही;याबाबत स्त्रियांना काय वाटतं? 2017 मध्ये तुकाराम मुंढेंनी पीएमपीची धुरा स्वत:च्या खांद्यावर घेतल्यानंतर अनेक धाडसी निर्णय घेतले होते. यात एखाद्या स्टॉपवर गाडी न थांबल्यास चालकावर दंडात्मक कारवाई करण्याची तरतूदही करण्यात आली होती. तसंच जर चालकाकडून एखादी चूक झाली किंवा त्याने सिग्नल तोडला तर त्याच्या पगारातून 100 रुपये दंड ठरवण्यात आला होता. एवढंच नाहीतर कामचुकार कामगारांना त्यांनी घरचा रस्ता सुद्धा दाखवला होता. तसंच ठेकेदारांवरही त्यांनी कारवाईचा बडगा उगारला होता. त्यामुळे विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी एकत्र येत तुकाराम मुंढे यांची बदली करण्याची मागणी केली होती, त्यात त्यांना यश आले होते. तुकाराम मुंढेंची पुण्यातून बदली झाल्यानंतर त्यांनी घेतलेले अनेक निर्णय रद्द करण्यात आले होते.
Published by:sachin Salve
First published: