पुणे, 11 मे : जगभरात कोरोनाचा (Coronavirus) कहर वाढत आहे. अशावेळी लॉकडाऊनमुळे सर्व सेवा बंद असल्याने विविध देशांमध्ये अडकलेल्या नागरिकांना मायदेशी परत आणण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी परदेशातून आलेल्या नागरिकांना पुण्यातील फाइव्ह स्टार हॉटेलांमध्ये 14 दिवस क्वारंटाइनसाठी ठेवण्यात आलं आहे. मात्र त्यांच्या दिवसेंदिवस वाढणाऱ्या मागण्यांमुळे पुणे पालिका (Pune) अधिकारी मेटाकुटीला आले आहे.
यापूर्वीच परदेशातून येणाऱ्या नागरिकांना राहण्याचा व खाण्याचा खर्च स्वत:च करावा लागेल असं राज्य सरकारने सांगितलं होतं. दोन दिवसांपूर्वी सिंगापूरहून पुण्यात आलेल्या नागरिकांची सोय बाणेरच्या सदानंद रिजन्सी हॉटेलमध्ये करण्यात आली आहे. या नागरिकांच्या मागण्या काही थांबायचं नावचं घेत नाही. या सुशिक्षितांची बडदास्त ठेवणं महापालिकेच्या अधिकाऱ्यांना कठीण झालं आहे. त्यांच्या मागण्यांमुळे अधिकारी पुरते मेटाकुटीला आले आहेत. इथे या नागरिकांकडून हॉटेल बदलून द्या, घरी जायचंय...हॉटेलचं बिल देणार नाही या विविध तक्रांरींमुळे महापालिकेचे अधिकारी वैतागले आहेत. इतकचं नाही तर या श्रीमंताकडून अनेक कारणांमुळे मंत्रालयातून फोन आणले जातात. एकीकडे पुण्यातील कोरोना रुग्णांची वाढणारी संख्या चिंता वाढवीत असताना आता या बड्या नागरिकांच्या मागण्यांचा पाठपूरावा करावा लागत आहे. पुण्यातील एका बड्या अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली आहे.
या बड्या आसामींकडून सुरू असलेल्या या मागण्यांवर एका खमक्या अधिकाऱ्याने या नागरिकांना चांगलाच दणका दिला आहे. शेवटी या अधिकाऱ्याने त्यांच्या वाढत्या मागण्यांवर फुलस्टॉप आणण्यासाठी मनपाच्या क्वारंटाईन सेंटरचा पर्याय समोर ठेवला. यानंतर मात्र ते परदेशी बाबू शांतच झाले. सध्या परदेशातून अनेक नागरिका मोठ्या संख्येने भारतात आणले जात आहे. हे नागरिक टप्प्याटप्प्याने येणार आहे. यापुढे पुणे विभागात आणखी 10000 नागरिक परदेशीून येणार असल्याचे सांगितले जात आहे. सध्याच्या परिस्थितीतमुळे पुणे अधिकारी मेटाकुटीला आले आहे. पुढे ही संख्या वाढली तर त्या नागरिकांना कसं सांभाळायचं हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे.
संबंधित -'मुंबईत राहिलो तर भुकेनं मरू'; रिक्षात संसार जमा करुन चालकांनी धरली गावाची वाट
संपादन - मीनल गांगुर्डे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.