Pune News: मोठी बातमी : पुण्यातील 42 ठिकाणी निर्बंध, सोसायट्यांसाठी असे असतील नवे नियम

Pune News: मोठी बातमी : पुण्यातील 42 ठिकाणी निर्बंध, सोसायट्यांसाठी  असे असतील नवे नियम

Pune Micro Containment Zone List: पुणे शहरात बाहेरील नागरिकांना सूक्ष्म प्रतिबंधक क्षेत्र असलेल्या सोसायट्यांमध्ये जाण्यास मनाई करण्यात आली आहे.

  • Share this:

पुणे, 3 मार्च : पुणे शहरात कोरोनाचे रुग्ण (Pune Corona Patient) वाढत असल्याने पालिकेकडून उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. शहरातील रुग्णांचे प्रमाण अधिक असलेले 42 भाग ‘सूक्ष्म प्रतिबंधक क्षेत्र’ (Pune Micro Containment Zone List) घोषित करण्यात आले आहेत.

पालिकेच्या 15 पैकी दहा क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत ही क्षेत्र असून पाच क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत एकही क्षेत्र नाही. उर्वरित 10 क्षेत्रीय झोन कार्यालयाच्या हद्दीत मात्र कोरोनाचा फैलाव वाढू लागल्याने पालिकेने अखेर शहरात 42 प्रतिबंधित क्षेत्र (New Micro Containment Zone in Pune) जाहीर केली आहेत. दर 15 दिवसांनी त्याचा फेरआढावा घेतला जाईल आणि पुनर्रचना केली जाईल.

नोव्हेंबरनंतर कमी होत गेलेले कोरोना बाधित फेब्रुवारी महिन्याच्या दुस-या आठवड्यापासून झपाट्याने वाढू लागले आहेत. त्यामुळे प्रशासकीय पातळीवर अधिक खबरदारी बाळगण्यात येत आहे. शहरात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आलेली असून शाळा-महाविद्यालये आणि खासगी क्लासेस 14 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत.

हेही वाचा एका बाजूला 93 वर्षांची आजेसासू आणि दुसरीकडे सासू; इंदौरच्या अकोलेकरांच्या सुनेचं या फोटोमुळे होतंय कौतुक

कोरोना आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या आदेशानुसार, पालिकेने ज्या भागात कोरोना रूग्ण वाढत आहेत असे भाग सूक्ष्म प्रतिबंधक क्षेत्र निश्चित काही प्रमाणात निर्बंध घालण्यास सुरुवात केली आहे.

42 प्रतिबंधित क्षेत्रात नेमके निर्बंध काय?

सोसायट्यांमध्ये प्रवेश बंद :

बाहेरील नागरिकांना सूक्ष्म प्रतिबंधक क्षेत्र असलेल्या सोसायट्यांमध्ये जाण्यास मनाई करण्यात आली आहे. सोसायट्यांच्या बाहेर बॅरिकेड्स लावण्यात येणार असून रुग्णांच्या घरातील नातेवाईक, व्यक्तींना बाहेर पडण्यास मनाई आहे. सोसायटीच्या सभासदांची बैठक घेऊन सूचना देत एकत्र येण्यास मनाई केली जाणार आहे.

हेही वाचा कोरोना लस हवी आहे, पण कुठे मिळेल? घरबसल्या शोधा जवळील लसीकरण केंद्र

या सोसायट्यांमधील कच-याची पालिकेकडून स्वतंत्रपणे विल्हेवाट लावली जाणार आहे. बाधित नसलेल्यांना कामाची मुभा आहे. ज्या घरात कोणीही बाधित नसतील त्यांना दैनंदिन कामकाजासाठी बाहेर पडता येणार आहे. त्यांच्यावर बंधने असणार नाहीत. त्यांना सुरक्षित वावर ठेऊन सोसायटीत ये- जा करता येणार आहे.

क्षेत्रीय कार्यालय सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र :

वानवडी

नगर रस्ता

सिंहगड रस्ता

बिबवेवाडी

हडपसर

शिवाजीनगर

धनकवडी

वारजे

कर्वेनगर

कोंढवा

येवलेवाडी

भवानी पेठ

Published by: Akshay Shitole
First published: March 3, 2021, 8:16 PM IST

ताज्या बातम्या