• Home
  • »
  • News
  • »
  • pune
  • »
  • पुणे पालिकेचा खासगी हॉस्पिटल्सना दणका, रुग्णांना मिळवून दिले वाढीव बिलाचे तब्बल 4 कोटी!

पुणे पालिकेचा खासगी हॉस्पिटल्सना दणका, रुग्णांना मिळवून दिले वाढीव बिलाचे तब्बल 4 कोटी!

रुग्ण भरती असताना महापालिकेने एकूण 1365 रुग्णांची बिल तपासली. यातील सुमारे 1000 बिलांची रक्कम जास्त असल्याचं आढळून आली.

  • Share this:
पुणे, 02 जून : कोरोनाच्या (Corona) काळात रुग्णालयात भरती असलेल्या रुग्णांकडून हॉस्पिटल्सनी (Private Hospital ) भरमसाठ बिल आकारणी केल्याच्या अनेक तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत. तर दुसरीकडे, पुणे महापालिकेनं (pune municipal corporation) ऑडिटर नियुक्त केले होते, त्यामुळे गेल्या दीड वर्षात सुमारे एक हजार रुग्णांचे तब्बल 4 कोटी रुपये बिलाच्या तपासणीतून कमी केले असल्याची बाबसमोर आला आहे. पुणे महापालिकेनं रुग्णांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी दीड वर्षापूर्वीच सगळ्या खाजगी हॉस्पिटल्समध्ये महापालिकेचे ऑडिटर नियुक्त केले होते. राज्य शासनाने ठरवून दिलेल्या दराप्रमाणेच हॉस्पिटलकडून बिल आकारणी होते की नाही याबाबतची तपासणी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून केली जात होती. महत्त्वाची बाब म्हणजे, गेल्या दीड वर्षात सुमारे एक हजार रुग्णांचे तब्बल 4 कोटी रुपये बिलाच्या तपासणीतून कमी करण्यात आले आहेत, तर 26 बिल भरून घरी गेलेल्या रुग्णांना सुमारे 20 लाख रुपयांचा परतावा रुग्णालयांकडून महापालिकेने मिळवून दिला आहे.

कोरोनामधील बेवारस मृतदेहांचे मंत्र्यांकडून अस्थी विसर्जन, पाहा PHOTOS

रुग्ण भरती असताना महापालिकेने एकूण 1365 रुग्णांची बिल तपासली. यातील सुमारे 1000 बिलांची रक्कम जास्त असल्याचं आढळून आली. या तपासणी करण्यात आलेल्या बिलांची एकूण रक्कम सुमारे 24 कोटी रुपये होती. तपासणी दरम्यान, सुमारे साडेचार कोटी रुपये इतकी रक्कम कमी करण्यात आली आहे. कमी केलेल्या बिलानंतर रुग्णालयात सुमारे 20 कोटी रक्कम अदा करण्यात आली. तर तपासणीच्या दुसऱ्या प्रकारात ज्याला पोस्ट ऑडिट असं म्हटलं जातं. त्यात रुग्णांच्या बिल भरल्या नंतर आलेल्या तक्रारीची आकडेवारी 222 इतकी होती. या सगळ्या प्रकरणांची तपासणी केल्यानंतर 100 प्रकरणांमध्ये हॉस्पिटलला नोटिसा देण्यात आल्या. यापैकी 15 प्रकरणांमध्ये कागद पत्र पूर्तता नसल्याने चौकशी सुरू आहे. आलेल्या तक्रारींपैकी 89 तक्रारी बिल योग्य असल्याचं निदर्शनास आल्यानंतर निकाली काढण्यात आल्या आहेत. आणि उर्वरित २६ प्रकरणांमध्ये रुग्णालयांनी जास्त बिल आकरल्याच चौकशीत स्पष्ट झालंय.

सोहमला वठणीवर आणायला पुन्हा जुनी शुभ्रा परतणार; 'अग्गंबाई सुनबाई'त नवा ट्वीस्ट

या प्रकरणात 18 लाख रुपये रिफंड करण्यात यश मिळालंय. यात काही रुग्णांना तर 50 हजार रुपयांपासून एक लाख रुपयांपर्यंतच्या जास्त करण्यात आलेल्या रकमेचा परतावा मिळाला आहे. आतापर्यंत आलेल्या वाढीव बिलाच्या सर्वाधिक तक्रारी या सह्याद्री हॉस्पिटलच्या आहेत, अशी माहिती सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ.मनीषा नाईक यांनी दिली आहे
Published by:sachin Salve
First published: