मराठी बातम्या /बातम्या /पुणे /Pune budget 2023 : पुणे पालिकेचा अर्थसंकल्प सादर, पुणेकरांना दिलासा, 'या' आहेत महत्त्वाच्या घोषणा

Pune budget 2023 : पुणे पालिकेचा अर्थसंकल्प सादर, पुणेकरांना दिलासा, 'या' आहेत महत्त्वाच्या घोषणा

आयुक्त विक्रम कुमार यांनी 9515 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला आहे.

आयुक्त विक्रम कुमार यांनी 9515 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला आहे.

पुणे महानगर पालिकेचा प्रशासकीय अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला आहे

वैभव सोनवणे, प्रतिनिधी

पुणे, 24 मार्च : पुणे महापालिकेच्या वतीने चालू आर्थिक वर्ष 2023-24 चा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये मिळकर आणि पाणीपट्टी दरांमध्ये कुठलीच वाढ करण्यात आली नाही, त्यामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसंच नियमित मिळकत कर भरणाऱ्यांसाठी बक्षीस जाहीर केले जाणार आहे.

पुणे महानगर पालिकेचा प्रशासकीय अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला आहे. २०२३-२४ वार्षिक अर्थसंकल्प पुणे महानगरपालिकेचे आयुक्त (प्रशासक) यांनी सादर केला आहे. आयुक्त विक्रम कुमार यांनी ९५१५ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला आहे.

मागील वर्षीपेक्षा यंदाच्या बजेटमध्ये 923 कोटींची भर करण्यात आली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात सर्वाधिक तरतूद पाणीपुरवठा करण्यासाठी करण्यात आली आहे. पाणी पुरवठ्यासाठी 1321 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. शहरातील मलिनिसरण साठी ८१२ कोटी रुपये तर घनकचरा व्यवस्थापनसाठी ८४६ कोटींची तरतूद केली आहे. वाहतूक नियोजन आणि प्रकल्पासाठी 590 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. विशेष म्हणजे, पगार आणि पेन्शनवर सुमारे 3100 कोटी खर्च होणार आहे.

पुण्याच्या अर्थसंकल्पातील मुद्दे

- पुण्यातील रस्त्यासाठी ९९२ कोटी रुपयांची तरतूद

- पी एम पी एल साठी ४५९ कोटी रुपयांची तरतूद

- पुणे शहरातील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणासाठी ४६८ कोटी रुपये

- आरोग्यासाठी ५०५ कोटी रुपयांची तरतूद

- नियमित मिळकत कर भरणाऱ्याना पुणे महानगर पालिका बक्षीस जाहीर करणार, यासाठी १ कोटी रुपयांची तरतूद

- मिळकर आणि पाणीपट्टी दरांमध्ये कुठलीच वाढ नाही

- वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पुण्यात ८ नवीन उड्डाणपूल उभारणार

- नव्याने समाविष्ट 23 गावांसाठी विशेष तरतूद

- पगार आणि पेन्शनवर सुमारे ३१०० कोटी खर्च होणार

- पुण्यात होणारे काही महत्त्वाचे प्रकल्प:

- पुण्यात कचऱ्यापासून हायड्रोजन प्रकल्प उभारणार

- वारजे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल

- सिंहगड रोड उड्डाणपूल, नदी पुनर्जीवन प्रकल्प होणार

- डॉग पार्क, हायड्रो ऊर्जा प्रकल्प, चार्जिंग स्टेशन उभारणे आदींचा समावेश

- श्वान प्रेमींसाठी पुण्यात डॉग पार्क उभारण्यात येणार

- शहरात फेरीवाले यांच्यासाठी देखील hawkers प्लाझा/ hawkers पार्क उभी करणार

First published:
top videos