मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

स्वप्निल लोणकरच्या कुटुंबियांना 19 लाखांचा धनादेश, देवेंद्र फडणवीसांची मोठी मदत

स्वप्निल लोणकरच्या कुटुंबियांना 19 लाखांचा धनादेश, देवेंद्र फडणवीसांची मोठी मदत

Devendra Fadnavis help swapnil lonkar family: विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्वप्निलच्या कुटुंबियांना मदत केली आहे.

Devendra Fadnavis help swapnil lonkar family: विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्वप्निलच्या कुटुंबियांना मदत केली आहे.

Devendra Fadnavis help swapnil lonkar family: विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्वप्निलच्या कुटुंबियांना मदत केली आहे.

  • Published by:  Pooja Vichare

पुणे, 22 जुलै: MPSCची परीक्षा देणाऱ्या (Pune MPSC Student Suicide) पुण्यातील 24 वर्षीय स्वप्निल लोणकर (Swapnil Lonkar) यानं राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर बरीच खळबळ उडाली. स्वप्निलनं अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली होती. त्यात तो पास देखील झाला होता. मात्र यानंतरही त्याला नोकरी मिळाली नाही आणि याच नैराश्यातून त्यानं हे धक्कादायक पाऊल उचललं आहे. अशातच विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्वप्निलच्या कुटुंबियांना मदत केली आहे.

स्वप्निलच्या कुटुंबियांवर कर्जाचा डोंगर होता. फडणवीस यांनी मदत करत 19 लाख 96 हजार 965 रुपयांचं कर्जाची परतपेड करणारा धनादेश भाजपनं वतीनं स्वप्निलच्या कुटुंबियांना सुपूर्द केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं एक छोटेखानी कार्यक्रम आज आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात स्वप्निल लोणकरचे वडिल सुनील तात्याबा लोणकर यांनी फडणवीस यांच्या हस्ते 19 लाख 96 हजार 965 रूपयांचा धनादेश सुपूर्द केला.

मोठी बातमी: अटक टाळण्यासाठी राज कुंद्रानं पोलिसांना दिली 25 लाखांची लाच?

स्वप्निलच्या कुटुंबियांवर शिवशंकर ग्रामीण बिगरशेती पतसंस्था मर्यादित या संस्थेचं कर्ज होतं. तसंच त्याच्या वडिलांचा असलेला प्रिटींग प्रेसचा व्यवसायही बंद झाला होता.

स्वप्निलची पार्श्वभूमी

स्वप्निल सुनील लोणकर (वय 24) असं या विद्यार्थ्यांचं नाव आहे. स्वप्निल हा सिव्हिल इंजिनिअर (Civil engineer) होता आणि त्यानं मोठ्या जिद्दीनं MPSC ची परीक्षा दिली होती आणि उत्तीर्णही झाला होता. मात्र गेल्या दोन वर्षांपासून त्याला नोकरी मिळाली नव्हती.

इंजिनिअरींग शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यानं MPSC च्या परीक्षेची तयारी सुरु केली. स्वप्निल 2019 मध्ये झालेल्या एमपीएससीच्या पूर्व आणि मुख्य परीक्षांमध्ये उत्तीर्ण झाला होता. मात्र कोरोनाच्या निर्बंधामुळे त्याची मुलाखत दीड वर्षांपासून झाली नव्हती. 2020 साली त्याने पूर्व परीक्षाही दिली. त्यातही तो उत्तीर्ण झाला.

दारात नाहीतर रस्त्यावरच्या खड्ड्यांभोवती महिलांनी काढली रांगोळी, बघा PHOTOS

स्वप्निलला दहावीत 91 टक्के मिळाले होते. तो अनेक सामाजिक उपक्रमांमधेही तो सहभागी असायचा. एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झालो की वडिलांनी गावाकडे घर बांधण्यासाठी घेतलेले कर्ज फेडाण्याचं स्वप्निलच स्वप्न होतं.

First published:

Tags: BJP, Devendra Fadnavis, Mpsc examination, Pune