PHOTOS : चक्क कढई घालून हेल्मेट सक्तीला विरोध, पाहा पुणेकरांचं अजब आंदोलन
पुण्यामध्ये हेल्मेट सक्तीला विरोध करण्यासाठी हेल्मेट विरोधी कृती समितीतर्फे पगडी, फेटे घालून सविनय कायदेभंगाचं आंदोलन करण्यात आलं.

पुण्यामध्ये हेल्मेट सक्तीला विरोध करण्यासाठी हेल्मेट विरोधी कृती समितीतर्फे पगडी, फेटे घालून सविनय कायदेभंगाचं आंदोलन करण्यात आलं.

सर्वपक्षीय नेते, स्वयंसेवी कार्यकर्ते सहभागी झाले होते. हेल्मेट घालणं हा कायदा झाला आहे, तो मोडण्यासाठी हेल्मेटऐवजी पगडी, फेटे घालून यासगळ्यांनी आंदोलन केलं.

अहो, फक्त पगडी आणि फेटेच नाही तर चक्क एका वकिलाने फेटे घालून हेल्मेट सक्ती करणाऱ्या पोलिसांनाच आव्हान दिलं आहे.

पुणेकरांनी सुरू केलेल्या या आंदोनावर वाहतूक पोलीस करडी नजर ठेऊन आहेत.

वेगवेगळ्या पद्धतीचे फेटे आणि पगड्या पुणेकरांनी घातल्या आहेत. आमच्यावर हेल्मेट सक्ती म्हणजे सरकारचा आर्थिक राजकारण असल्याचा आरोपही पुणेकरांकडून करण्यात आला आहे.

हेल्मेट घातल्याने जिवंत राहणार असं कुठे लिहलं आहे का? असे भन्नाट प्रश्न मांडत पुणेकरांनी सरकारच्या हेल्मेट सक्तीला नकार दिला आहे.

'हेल्मेट सक्ती हटाव, पुणेकरांना बचाव'; असे पोस्टर आणि घोषणाबाजी करत पुणेकर रस्त्यावर उतरले आहेत.

'हेल्मेट उद्पादकांचे हीत साधणाऱ्या पोलिसांचा धिक्कार असो', असे पोस्टर घेऊन पुणेकरांनी त्यांचाय संताप व्यक्त केला आहे.

आम्ही आजपर्यंत हेल्मेट घातला नाही. पण तरीही आमचा कधीच अपघात झाला नाही असं पुणेकरांचं म्हणणं आहे.

या आंदोलनात महिला आणि कॉलेज विद्यार्थीदेखील सहभागी झाले आहेत.
First Published: Jan 3, 2019 02:12 PM IST