Home /News /pune /

Pune Crime: परकरच्या नाडीने आईनेच आवळला पोटच्या मुलाचा गळा, अनैतिक संबंधात ठरत होता अडथळा

Pune Crime: परकरच्या नाडीने आईनेच आवळला पोटच्या मुलाचा गळा, अनैतिक संबंधात ठरत होता अडथळा

परकरच्या नाडीने आईनेच आवळला पोटच्या मुलाचा गळा, कारण ऐकून सर्वांनाच बसला धक्का

परकरच्या नाडीने आईनेच आवळला पोटच्या मुलाचा गळा, कारण ऐकून सर्वांनाच बसला धक्का

जन्मदात्या आईनेच आपल्या पोटच्या मुलाची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांसमोर धक्कादायक माहिती उघड झाली आहे. (Pune Crime News)

जुन्नर, 19 फेब्रुवारी : जन्मदात्या आईनेच आपल्या पोटच्या मुलाचा गळा आवळून खून (Mother killed own son) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात (Junnar Taluka Pune district) ही घटना घडली आहे. या प्रकरणात पोलिसांनी तपास केला असता धक्कादायक कारण समोर आलं आहे. ज्या कारणासाठी या महिलेने पोटच्या मुलाची हत्या केली ते ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे. काय घडलं नेमकं? जुन्नर तालुक्यातल्या येडगाव जवळच्या परिसरात ही घटना घडली आहे. विद्या कदम असे आरोपी महिलेचे नाव आहे. 20 जानेवारी 2022 रोजी पहाटे 4.30 वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी महिलेने आपल्या 13 वर्षीय मुलाचा गळा आवळला. परकरच्या नाडीने गळा आवळून त्याला संपवण्याचा प्रयत्न केला. यावेळी मुलगा झोपेत होते. गळा आवळल्याने मुलगा तडफडू लागला. वाचा : बाथरूममध्ये मृतावस्थेत आढळली महिला; हत्या झाल्याचं उघड, 10 दिवसांनंतर धक्कादायक माहिती आली समोर मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू मुलगा तडफडू लागल्याने त्याला प्रथम नारायणगाव येथे खाजगी रुग्नालयात आणि त्यानंतर पुढील उपचारासाठी स्वतः ससून रुग्णालय पुणे येथे नेले. रुग्णालयात उपचार सुरू असताना या मुलाचा 27 जानेवारी 2022 रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत विद्या कदम हिने ससून रुग्णालयात खोटे कारण सांगत घडलेली माहिती लपवली आणि मुलाचा अंत्यविधी केला. वाचा : भलत्याच कारणावरून पती द्यायचा त्रास, पुण्यात 21 वर्षीय विवाहितेनं संपवलं जीवन पोलिसांना घातपाताचा संशय आला आणि... मृतक मुलाचे कागदपत्र पोलीस स्टेशनला प्राप्त झाल्यानंतर प्राथमिक तपास करताना आणि कागदाचे अवलोकन करता प्रथमदर्शनी सदर मुलाचा घातपात झाल्याचा संशय पोलिसांना आला. पोलिसांना संशय आल्याने विद्या कदमला चौकशीसाठी नारायणगाव पोलीस स्टेशनला बोलावले होते. मात्र तिने उडवा उडवीची तसेच असमाधानकारक उत्तरे दिली. बोलण्यात विसंगती आल्याने ती काहीतरी माहिती लपवत असल्याचा संशय आल्याने तिची अधिक चौकशी केली. यावेळी तिने स्वतःच्या मुलाचा परकरच्या नाडीने गळा आवळुन खून केल्याची कबुली दिली. नारायणगाव पोलीस ठाण्यात मुलाचे वडील सचिन शंकर कदम यांनी दिनांक 17 फेब्रुवारी 2022 रोजी याबाबत फिर्याद दिली आहे. नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरिक्षक पृथ्वीराज ताटे पुढील तपास करत आहेत.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Crime, Murder, Pune

पुढील बातम्या