मुलीने केली आईची शेवटची इच्छा पूर्ण.. 'रमजान महिन्यात मरण आलं, दहन करण्याऐवजी दफन केलं'

मुलीने केली आईची शेवटची इच्छा पूर्ण.. 'रमजान महिन्यात मरण आलं, दहन करण्याऐवजी दफन केलं'

आईची अंतिम इच्छा पूर्ण होत असलेला त्या क्षणाला बघून लक्ष्मीच्या डोळ्यातील पाणी बरच काय सांगत होते. आई गेल्याची दुःख ही मनात होती. पण इच्छा पूर्ण माझ्या हाताने होत आहे हे आनंद त्यांच्या चेहऱ्यावरून दिसून येत होता.

  • Share this:

पुणे, 21 एप्रिल: चार वर्षापूर्वी छगनबाई किसन ओव्हाळ (Chhaganbai Kisan Ovhal) या महिलेने आपली एकुलती एक मुलगी लक्ष्मी (Laxmi)ला सांगितले की, रमजानच्या पवित्र उपवासाच्या (Ramadan fast) दिवशी जर मला मरण आले तर कृपया तू माझ्या शरीराला समशानभूमीत दहन करू नको मला मुस्लिम धर्म रिती-रिवाजानुसार अंतिम संस्कार नमाज अदा करून मुस्लिम दफनभूमी येथे कर. चार वर्षांपूर्वी आईने आपल्या मुलीसमोर ही इच्छा व्यक्त केली होती. नेमका रमजानचा पवित्र महिना सुरू असताना छगनबाई यांचे कोरोना या आजाराने निधन (death deu to covid) झाले. आईची अंतिम इच्छा पूर्ण करण्यासाठी रात्रभर मुलगी लक्ष्मी यांनी खूप परिश्रम घेऊन शेवटी आईची अंतिम इच्छा पूर्ण करून येरवडा येथील जय जवान नगर मुस्लिम कब्रस्तान येथे मुस्लिम धर्म रितीरिवाजानुसार दफन केले.

छगनबाई किसन ओव्हाळ राहणार बर्मा शेल कंपनी इंद्रा नगर लोहगाव रोड पुणे वय वर्ष 72 एक दिवसापूर्वी संधिवातचा त्रास होत असताना घरात राहून औषध उपचार घेत असताना अचानक पणे जास्त त्रास होऊ लागला छगनबाई या महिलेला शिवाजीनगर येथील जम्बो हॉस्पिटल येथे रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले. डॉक्टरांनी सांगितले की, हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यापूर्वीच तुमच्या आईचे निधन झाले आहे तरी कृपया आपण यांना ससून हॉस्पिटल येथे घेऊन जाऊन मृत्यू दाखला तयार करावा. मुली सोबत असलेले स्थानिक कार्यकर्त्यांच्या मदतीने छगनबाई यांना मुलगी लक्ष्मीने ससून रुग्णालय येथे 40 नंबर वार्डमध्ये दाखल केले. ससून हॉस्पिटल येथील डॉक्टरांनीही तपासणी केल्यानंतर सांगितले की तुमच्या आईचे निधन काही तासापूर्वी झालेले आहे. पुढील सर्व कागदपत्र बनविण्यासाठी एक्सरे काढणे व पोलिसांचा पंचनामा जरुरी आहे असं सांगितलं.

काही वेळातच त्यांच्या आईचा केलेला टेस्ट पॉझिटिव्ह आला. नियमाप्रमाणे विमानतळ पोलीस स्टेशन येथील विजय भोसले साहेबांनी येऊन पंचनामा तयार केला व लक्ष्मी यांनी रात्रीच्या दोन वाजता हिंमतीने एड.आयुब इलाही बक्ष, भीमा साखरे, सचिन चौघुले, बलभीम पवार, भारत जाधव, बसू चलवादी, स्थानिक कार्यकर्ता सोबत स्वतः जाऊन आधार कार्ड चे झेरॉक्स व महत्त्वाचे डॉक्युमेंट घेऊन ससून हॉस्पिटल येथील मृत्यू दाखला बनविण्याचा काम सुरू केले. रात्रपाळीला असलेल्या मृत्यू दाखला देणारे असं बोलत होते की तुमची आई व तुम्ही तर धर्माने हिंदू आहे आणि मृत्यू पास मुस्लिम दफनभूमी येतील मागत आहे हे कसे शक्य आहे. मात्र तरीही तशी तुमची इच्छा असेल तर तसा ना हरकत पत्र तुम्ही मुली म्हणून सादर करा नंतरच तुम्हाला मुस्लिम कबरस्तान येथील पास बनविता येईल. स्वतःच्या अक्षराने लक्ष्मीने अर्ज तयार करून ना हरकत पत्र सादर केले व कायदेशीर रित्या येरवडा येथील जय जवान नगर मुस्लिम दफनभूमी येथे दफन करण्याचे पास देण्यात आले. सर्व कागद ससून येथील डेड हाऊसमध्ये जमा करण्यात आले.

वाचा: Nashik Oxygen leak: नाशिकमध्ये हाहाकार; मृतकांचा आकडा आणखी वाढला

नियमाप्रमाणे ससून डेड हाऊस येथील डॉक्टरांनी महानगरपालिकेच्या covid cremation ग्रुपमध्ये छगनबाई किसन ओव्हाळ यांचे निधन झाले आहे. कृपया आपण रुग्णवाहिका पाठवावी असा मेसेज हॉस्पिटलच्या वतीने करण्यात आला. दफन पास तयार केले पण आईला दफन करणार कोण लक्ष्मी पुढे प्रश्न निर्माण झाला लक्ष्मी यांच्या परिचयाचे असलेले अ‍ॅड. आयुब इलाही बक्ष यांनी सांगितले की, तुम्ही तशी काही काळजी करू नका मी मूल निवासी मुस्लिम मंचाच्या कार्यकर्त्यांना तुम्हाला पूर्ण मदत करायला सांगतो. पहाटे चार वाजता जय जवान नगर येथील मुस्लिम कब्रस्तानमध्ये मूलनिवासी मुस्लिम मंचाचे अध्यक्ष अंजुम इनामदार, सलीम शेख, इमतियाज पटेल, आसिफ शेख व इंदिरानगर भागातील सुमारे 50 लोक सर्व जाती-धर्मांच्या लोकांच्या उपस्थितीत छगनबाई ओव्हाळ यांची नमाजे जनाजा अदा करून खाके सुपूर्द करण्यात आला.

आईची अंतिम इच्छा पूर्ण होत असलेला त्या क्षणाला बघून लक्ष्मीच्या डोळ्यातील पाणी बरच काय सांगत होते. आई गेल्याची दुःख ही मनात होती. पण इच्छा पूर्ण माझ्या हाताने होत आहे हे आनंद त्यांच्या चेहऱ्यावरून दिसून येत होता. लक्ष्मीच्या सोबत असलेल्या राहुल पाटोळे - पती यांनी लक्ष्मीला साथ दिली तसेच वस्तीतील महिला माधवी मायकल, सुवर्णा गोडसे, सुनीता माने आणि स्थानिक महिला बरोबर राहून आधार देत होत्या. छगनबाई यांनी किसन ओव्हाळ यांच्यासोबत सुमारे चाळीस वर्षांपूर्वी लग्न केले होते. छगनबाई यांचा पूर्वीचा धर्म इस्लाम होता. दोन्ही परिवार गुण्यागोविंदाने राहत होते एकमेकाच्या सण मोठ्या उत्साहाने साजरा करीत होते.

किसन ओव्हाळ हे आंबेडकरी चळवळीतील एक मोठे कार्यकर्ते होते. इंदिरानगर या भागात एका छोट्याशा खोलीत राहून खूप लोकांचे कामे केली. किसन गंगाराम ओव्हाळ उर्फ (तात्या) पत्नी छगनबाई किसन ओव्हाळ ऊर्फ (काकू) या दोघांनी मिळून इंदिरानगर भागात भरपूर काम केले. एअरफोर्सच्या हद्दीतील ही जागा मिळविण्यासाठी ह्या दाम्पत्याचा सिंहाचा वाटा आहे सदर जागा 5 एकर 17 गुंठे या जागेत 4 हजारापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या लोकांसाठी आधार कार्ड बनविणे, रेशन कार्ड, पाण्याची समस्या शिक्षण, आरोग्य या विषयावर त्यांनी भरपूर काम केले.

लोकांच्या अडीअडचणी धावून जाण्याचा काम दोन्ही नवरा-बायको करत होत्या. बौद्ध विहार बनविण्यापासून तर स्थानिक मुस्लिम बांधवासाठी मस्जिद बनविण्यामध्ये काकूंचा खूप मोठा वाटा होता. सतत लोकांच्या अडीअडचणीत काम करणारी काकू आपल्यातून गेल्याने इंदिरानगर भागातील लोकांमध्ये प्रचंड दुखत होता. काकूंचा अंत्यदर्शन घेण्यासाठी व शेवटचा निरोप देण्यासाठी अनेक लोक रात्री उशिरापर्यंत आपल्या घरासमोर काकून ची वाट पाहत होती. रात्री उशिरा छगनबाई यांच्यावर मुस्लिम दफनभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

Published by: sachin Salve
First published: April 21, 2021, 8:50 PM IST

ताज्या बातम्या