राज ठाकरेंच्या मुलाने केली बैलगाडी सफारी, PHOTO झाला व्हायरल

राज ठाकरेंच्या मुलाने केली बैलगाडी सफारी, PHOTO झाला व्हायरल

राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हेदेखील राजकारणात मोठ्या प्रमाणात सक्रीय झालेले पाहायला मिळत आहेत.

  • Share this:

पुणे, 3 फेब्रुवारी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी पक्षाकडून रणनीती आखण्यात येत आहे. याच रणनीतीचा भाग म्हणून आता पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हेदेखील राजकारणात मोठ्या प्रमाणात सक्रीय झालेले पाहायला मिळत आहेत.

पक्षविस्तारासाठी अमित ठाकरे हे राज्यातील विविध भागात जात असतात. अशातच पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात सावरदरी इथे अमित ठाकरे यांच्या हस्ते मनसेच्या पक्ष कार्यालयाचे उद्घाटन झाले. यावेळी अमित ठाकरे हे चक्क बैलगाडीत बसलेले पाहायला मिळाले. यावरच ते थांबले नाहीत तर त्यांनी काही काळासाठी बैलही हाकले. यावेळी अमित ठाकरे यांचा वेगळाच अंदाज पाहायला मिळाला.

हेही वाचा - महाराष्ट्र काँग्रेसमध्ये होणार अनेक मोठे बदल, परिवर्तनासाठी हायकमांड आग्रही

खेड तालुक्यातील सावरदरी या गावात संदीप पवार हे ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले आहेत. त्यांच्याच जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनासाठी अमित ठाकरे यांनी सावरदरी या गावाला भेट दिली. एमआयडीसी चाकणच्या जवळ असलेले हे गाव आधुनिकता आणि पारंपरिक अशा दोन्हीचा संगम असलेलं गाव आहे.

या गावात कार्यालयाचे उद्घाटन झाल्यानंतर पदाधिकार्‍यांच्या आग्रहाखातर अमित ठाकरे यांनी चक्क बैलगाडी चालवली. अमित ठाकरे यांचं बैलगाडी चालवण्याचं दृश्य पाहता क्षणी अनेकांना राज ठाकरे यांच्या एका भाषणातील काही ओळी आठवल्या. राज ठाकरे म्हणाले होते की मला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील शेतकऱ्यांची पोरं जीन्स टी-शर्ट घालून ट्रॅक्टर चालवताना दिसली पाहिजे. महाराष्ट्रातला शेतकरी इतका सधन आणि आधुनिक झाला पाहिजे.

दरम्यान, अमित ठाकरे यांची ही बैलगाडी वारी सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.

Published by: Akshay Shitole
First published: February 3, 2021, 10:42 PM IST

ताज्या बातम्या