पुण्यातही मनसैनिकांनी फेरीवाल्यांना हुसकावलं

पुण्यातही मनसैनिकांनी फेरीवाल्यांना हुसकावलं

मनसेच्या फेरीवाल्यांविरोधातल्या आंदोलनाचं लोण आता पुण्यातही पोहचलंय. पुण्यातल्या फर्ग्युसन रोडवरील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात आंदोलन केलं. मनसे कार्यकर्त्यांनी फुटपाथवर थाटलेल्या दुकानांची तोडफोड केली. फेरीवाल्यांचा माल रस्त्यावर फेकून दिला.

  • Share this:

पुणे, 02 नोव्हेंबर : मनसेच्या फेरीवाल्यांविरोधातल्या आंदोलनाचं लोण आता पुण्यातही पोहचलंय. पुण्यातल्या फर्ग्युसन रोडवरील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात आंदोलन केलं. मनसे कार्यकर्त्यांनी फुटपाथवर थाटलेल्या दुकानांची तोडफोड केली. फेरीवाल्यांचा माल रस्त्यावर फेकून दिला. याअगोदर सिंहगड रस्त्यावर आंदोलन झालं. राजाराम पुलावरील फेरीवाल्यांना मनसेवाल्यांनी हुसकावून लावलं. त्यानंतर फर्ग्युसन रोडवरही आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनादरम्यान, फेरीवाल्यांच्या स्टॉल्सची आणि सामानाची मोठ्या प्रमाणावर तोडफोड करण्यात आलीय.

पुण्यात परवादिवशीच मनसेच्या कार्यकर्त्यांनी पालिका आयुक्तांना भेटून फेरीवाल्यांवर कारवाईची मागणी केली होती. पण त्यानंतरही पालिका प्रशासनाकडून फेरीवाल्यांविरोधात कोणतीच ठोस कारवाई न झाल्याने मनसेनं आज पुण्यातल्या फेरीवाल्यांविरोधात आक्रमक होत, त्यांना ठिकठिकाणांहून हुसकावून लावलंय. त्यामुळे मुंबईपाठोपाठ आता पुण्यातही फेरीवाले विरूद्ध मनसे आमनेसामने आलेत. राज ठाकरेंच्या आदेशानुसार हे आंदोलन हाती घेण्यात आलंय.

First published: November 2, 2017, 7:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading