Home /News /pune /

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल येण्यास लागणार 40 तास!

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल येण्यास लागणार 40 तास!

पोस्टल मतदानासह पदवीधर मतदारसंघासाठी 2 लाख 47 हजार 917 तर शिक्षकसाठी 53 हजार19 इतके मतदान झाले आहे.

पुणे, 3 डिसेंबर: पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी मतमोजणी प्रक्रियेला पुण्यातल्या बालेवाडी इथल्या शिव छत्रपती क्रीडा संकुलात सुरुवात झाली आहे. या दोन्ही मतदारसंघात निकाल पहिल्या पसंतीच्या मतामध्येच लागणार की पुढील फेऱ्याची मतमोजणी करावी लागणार, याबाबतचं अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. त्यामुळे पदवीधरसाठी रात्री नऊ वाजताच्या सुमारास तर शिक्षकसाठीचे चित्र साधारण सायंकाळी 7 वाजेपर्यत स्पष्ट होऊ शकतं, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे. हेही वाचा...भाजपच्या विजयामुळे 'महाविकास आघाडी'चं उद्याचं भवितव्य स्पष्ट, दरेकरांचा टोला सकाळी आठ वाजता मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली. सुरवातीला विभागातील पाच जिल्ह्याच्या मतपत्रिका तसेच पोस्टल मत पत्रिका एकत्र करण्यात आल्या, पदवीधर साठी 867 पोस्टल तर शिक्षकसाठी 32 पोस्टल मतपत्रिका प्राप्त झाल्या आहेत. या सर्व मतपत्रिका सरमिसळ करण्याचे काम सुरू असून ही प्रक्रिया पूर्ण व्हायला दुपारचे दोन वाजणार आहेत. त्यानंतर दुपारी 3 वाजता प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होणार असून वैध अवैध मत बाजूला करत असतानाच पहिल्या पसंतीच्या मतांची मोजणी केली जाणार आहे. पोस्टल मतदानासह पदवीधर मतदारसंघासाठी 2 लाख 47 हजार 917 तर शिक्षकसाठी 53 हजार19 इतके मतदान झाले आहे. या सर्व मतपत्रिका एकत्र करून त्यातल्या वैध आणि अवैध मतपत्रिका वेगळ्या केल्या जात असतानाच विजयाचा कोटा ठरण्यासाठी रात्रीचे नऊ वाजू शकतात, असा अंदाज विभागीय आयुक्तांनी वर्तवला आहे. या प्रक्रियेत एखाद्या उमेदवाराने विजयासाठीचा कोटा पूर्ण केला तर शिक्षकचा निकाल साधारण सायंकाळी 7 वाजता तर पदवीधरचा निकाल रात्री नऊ वाजता लागू शकतो. पहिल्या पसंतीच्या मतामध्येच विजय मिळवण्यासाठी वैध मतदान भागिले 2, अधिक 1 मत आवश्यक आहे. त्यामुळे एकतर्फी निवडणूक झाल्यास रात्री नऊ वाजता निकाल अपेक्षित आहे. हेही वाचा...भाजपच्या जोरदार संघटनात्मक हालचाली सुरु, सरकारबाबत प्रभारींनी मांडलं भाकीत पहिल्या पसंतीचा कोटा पूर्ण होऊ शकला नाही तर दुसऱ्या पसंतीची मते मोजली जाणार आहेत. ही प्रक्रिया करण्याची वेळ आल्यास त्याच्या पदवीधरसाठी 60 फेऱ्या तर शिक्षकसाठी 32 फेऱ्या घ्याव्या लागणार आहेत. प्रत्येक फेरीसाठी अंदाजे अर्धा तास वेळ गृहीत धरल्यास निकाल लागण्यासाठी आज रात्री 9 नंतर पुढे 30 तास पदवीधरसाठी लागू शकतात तर शिक्षकसाठी 16 तास लागू शकतात, असा प्रशासनाचा अंदाज आहे.
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Maharashtra, Pune news

पुढील बातम्या