व्वा...आमदारांनी धुतले सफाई कामगारांचे पाय

कुंभमेळ्यात केलेल्या कामाचं कौतुक म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रयागराज इथं सफाई कामगारांचे पाय धुवून कृतज्ञता व्यक्त केली होती. त्याचंच अनुकरण आमदार सुनील अण्णा टिंगरे यांनी केलंय.

News18 Lokmat | Updated On: Nov 4, 2019 10:57 PM IST

व्वा...आमदारांनी धुतले सफाई कामगारांचे पाय

 दिवाळी संपली आणि आपण पुन्हा आपल्या दैनंदिन कार्यक्रमात अडकलो. पण ह्या दिवाळीच्या धावपळीमध्यें एक गोष्ट आपल्या लक्षात येत नाही की दिवाळी सण साजरा करत असताना कळत नकळत आपल्या कडून रस्त्यावर कचरा होतो, घाण होते.

सणवार असो वा उन्हाळा हिवाळा पावसाळा या तीनही ऋतूत सफाई कामगार आपल्या भागात सफाईचे काम अत्यंत चोखपणे बजावत असतात.

स्वतः सुटी न घेता दिवाळी सणात आपला परिसर स्वच्छ ठेवणाऱ्या सफाई कामगारांचा सत्कार वडगांवशेरीचे आमदार सुनिलअण्णा टिंगरे यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी फुलेंनगर पुणे परिसरातील सफाई कामगार मोठया संख्येने उपस्थित होते. आमदार सुनिल अण्णा टिंगरे यांनी सफाई कामगार यांचे पाय धुतले व पुष्पहार घालून भेटवस्तू देऊन सफाई कामगारांचा सत्कार केला.

Loading...

या कार्यक्रमाचे आयोजन वडगांवशेरी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा शिवानी उमेश माने यांचे वतीने करण्यात आले होते. या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होतेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 4, 2019 10:47 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...