• Home
  • »
  • News
  • »
  • pune
  • »
  • अजितदादांनी बैठकीला न बोलावल्यामुळे पुण्याचे महापौर नाराज, राष्ट्रवादीचे नेते म्हणाले, 'हा तर बालिशपणा'!

अजितदादांनी बैठकीला न बोलावल्यामुळे पुण्याचे महापौर नाराज, राष्ट्रवादीचे नेते म्हणाले, 'हा तर बालिशपणा'!

'आज जर बैठक होती तर आधी फक्त तुमच्या नेत्यांना निमंत्रण कसं गेलं. आम्हाला डावललं गेलं. काल कळवलं असतं तर मुंबईला गेलो असतो'

  • Share this:
पुणे, 29 जून : पुण्याचे (pune) पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी पुण्यातील प्रलंबित कामाबद्दल मुंबईत बैठक बोलावली. पण, या बैठकीला आपल्याला बोलावण्यात आलं नाही असं सांगत  पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ (pune mayor murlidhar mohol) यांना नाराजी व्यक्त केली आहे. आज मुंबईत मंत्रालयांमध्ये पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्याच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठी एक तातडीची बैठक बोलावली होती मात्र या बैठकीला राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे आणि चेतन तुपे हे दोन आमदार तर महापालिकेतल्या विरोधी पक्षनेता दिपाली धुमाळ यांच्यासह पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांना निमंत्रण देण्यात आलं होतं त्यानुसार हे सगळे आज मुंबईला रवाना झाले. या बैठकीत शहरातील विविध प्रलंबित विकास काम तातडीने मार्गी लावणे संदर्भात चर्चा होणार होती. मात्र, पुण्याचा महापौर या नात्याने या बैठकीला आपल्याला निमंत्रण मिळणं अपेक्षित होतं असं म्हणत महापौर मुरलीधर मोहोळ यांनी या बैठकीचे निमंत्रण न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली आहे. पंतप्रधान मोदी आजही उद्धव ठाकरे यांच्यासाठी 'नरेंद्रभाई', राऊतांचं सूचक विधान 'गेली चार वर्ष आम्ही महापालिकेचा विकास करताना आणि गेल्या दीड वर्षात करणाच्या काळातही महाविकास आघाडी सरकार सोबत पक्षीय राजकारण न करता समन्वय ठेवून काम केलं मात्र आता महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्याने पुणे शहराच्या विकास कामांमध्ये ही राजकारण सुरू झाल्याचे दिसते. त्यामुळे आज उपमुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला महापौर म्हणून आपल्याला निमंत्रण मिळाले नाही, असं वाटतं. आपल्याला या बैठकीला न बोलावणं हा आपला नाहीतर समस्त पुणेकरांचा अपमान आहे, अशी ही नाराजी मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केली आहे. 'आज जर बैठक होती तर आधी फक्त तुमच्या नेत्यांना निमंत्रण कसं गेलं. आम्हाला डावललं गेलं. काल कळवलं असतं तर मुंबईला गेलो असतो. गेले चार वर्ष आम्ही केलेलं काम पुणेकर पाहत आहेत. आता शेवटी जर असं वागत असतील तर ठीके आहे. पुणेकरांच्या समस्या कशानेही सुटणार असतील तर आनंद आहे', असंही मोहोळ म्हणाले. यंदाही गणेशोत्सव साधेपणानेच! राज्य सरकारने गणेश मंडळांसाठी जाहीर केली नियमावली 'मी आज गावी मुळशी तालुक्यात पोहोचल्यावर whatsapp ला निरोपाच पत्र मिळालं. मी कशासाठी राजकारण करू ? माझी तक्रार नाही, मला डावललं एवढंच माझं म्हणणं आहे की, मी पालकमंत्र्यांची एकाही बैठक चुकवली नाही. पवार साहेब,राजेश टोपे यांनी घेतलेल्या बैठकांना ही मी गेलो होतो', असंही मोहोळ म्हणाले. तर, 'मुरलीधर मोहोळ यांच्या आरोपाला उत्तर देताना ते बालिशपणा करत असल्याची टीका राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केली आहे. आजची बैठक कामांच्या संदर्भामध्ये लावली. त्या दोन्ही कामांची पत्र राष्ट्रवादीचे संबंधित आमदार सुनील टिंगरे आणि चेतन तुपे यांनी अजित दादा यांना लिहिलेल्या या पत्राची दखल घेऊन या दोघांनाही बैठकीला हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यात महापौर हे व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी होत असल्याची माहिती त्यांच्याच कार्यालयाने दिली होती. केवळ आपल्याला मुंबईला जाता आलं नाही म्हणून महापौर नाराज आहेत, आणखी काही हा शोधाचा विषय आहे. महापौरांनी हा असला बालिशपणा सोडून द्यावा, असा सल्लाही प्रशांत जगताप यांनी दिला आहे.
Published by:sachin Salve
First published: