पुणे, 29 एप्रिल: पुण्यातील ससून हॉस्पिटलला पीएम केअर फंडातून (PM Cares fund) मिळालेल्या 25 व्हेंटिलेटर्सपैकी 21 व्हेंटिलेटर्स (Ventilators) पुन्हा दुरुस्त करुन घेत ते आता वापरण्या योग्य झाले आहेत असा दावा पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केला आहे. पंधरा दिवसांपूर्वी कोरोना संदर्भातील आढावा बैठकीत ससूनचे (Sassoon Hospital) डिन मुरलीधर तांबे यांनी पीएम केअर फंडातून मिळालेले बहुतांश व्हेंटिलेटर्स खराब झाल्याचा आरोप केला होता.
ससूनच्या डिन यांनी केलेल्या या आरोपावरुन केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Javadekar) आणि ससूनचे डिन यांच्यात शाब्दिक चकमकही उडाली होती. या बैठकीनंतर महापौर मुरलीधर मोहोळ (Pune Mayor Murlidhar Mohol) यांनी हे सर्व खराब व्हेंटिलेटर्स पुणे मनपाच्या ताब्यात घेऊन या क्षेत्रातील तांत्रिक दुरुस्ती करणाऱ्या व्यक्तींकडून दुरूस्त करुन घेतले. त्यानंतर हे दुरुस्त करण्यात आलेले व्हेंटिलेटर्स पुन्हा वापरात आणण्याचे ठरवलंय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पीएम केअर्स फंडातून पुणे शहराला मिळालेल्या व्हेंटिलेटर्सपैकी 80 पेक्षा जास्त व्हेंटिलेटर्स ससूनला दिले होते त्यापैकी 34 व्हेंटिलेटर्स किरकोळ कारणांसाठी पूर्णपणे बंद ठेवले होते. याची चर्चा करोना आढावा बैठकीत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यासमोर झाली होती त्यानंतर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी तातडीने ससूनचे अधिष्ठाता डॉक्टर मुरलीधर तांबे यांच्याशी संपर्क करुन हे व्हेंटिलेटर्स महापालिकेच्या ताब्यात घेतले. त्यानंतर महापौरांनी हे व्हेंटिलेटर्स दुरुस्त करण्यासाठी एका विशेष तंत्रज्ञाच्या माध्यमातून सुरू करण्यात यश मिळवलं.
याबाबत माहिती देताना महापौर म्हणाले, 'महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही जास्तीत जास्त वेंटिलेटर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहोत. मात्र राज्य सरकारच्या वैद्यकीय शिक्षण विभागाचे अखत्यारीत असलेल्या 'ससून'मधील व्हेंटिलेटर बंद असल्याची गंभीर माहिती समोर आल्यानंतर याची तातडीने दखल घेतली आणि हे व्हेंटिलेटर महापालिकेच्या ताब्यात घेऊन ते अवघ्या आठ दिवसात सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र किरकोळ कारणांसाठी आताच्या काळात गरजेचे असलेले व्हेंटिलेटर मोठ्या संख्येने पूर्णपणे बंद ठेवणे ही गंभीर बाब आहे.
वाचा: Covishield पाठोपाठ Covaxin सुद्धा झाली स्वस्त; Bharat Biotech ने जारी केली कोरोना लशीची नवी किंमत
'दुरुस्त झालेल्या व्हेंटिलेटरपैकी 8 वेंटीलेटर ते बिबबेवाडी येथील रुग्णालयात कार्यान्वित करण्यात आले असून इतर व्हेंटिलेटर पुणे महानगरपालिका आणि ससूनमध्ये कार्यान्वित करण्यात येत आहेत. आताच्या काळात व्हेंटिलेटरची गरज असताना हे 21 व्हेंटिलेटर सुरू झाल्याने नक्कीच मोठा आधार मिळाला आहे, असेही महापौर मोहोळ म्हणाले.
'पीएम केअर्स'मधून पुणे शहराला नवे तीस वेंटिलेटर प्राप्त : महापौर
केंद्रीय मंत्री श्री प्रकाश जावडेकर यांनी केलेल्या घोषणेप्रमाणे वेंटीलेटर घ्यायला सुरुवात झाली असून पुणे महानगरपालिकेला पहिल्या टप्प्यात 'पीएम केअर्स'मधून वेंटिलेटर प्राप्त झाले आहेत. या 30 वेंटिलेटरमुळे आरोग्य यंत्रणेला मोठा आधार मिळणार आहे. तसेच शंकर महाराज मठ यांच्या माध्यमातून 5 व्हेंटिलेटर पुणे महानगरपालिकेला मिळाले.
ससूनला पीएम केअर फंडातून मिळालेल्या 25 व्हेंटीलेटर्स पैकी 21 व्हेंटिलेटर्स पुन्हा दुरूस्त करून घेत ते आता वापरण्या योग्य झाले आहेत असा दावा महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केला आहे. पंधरा दिवसांपूर्वी आढावा बैठकीत ससूनचे डिन मुरलीधर तांबे यांनी पीएम केअर फंडातून मिळालेले बहुतांश व्हेंटिलेटर्स खराब झाल्याचा आरोप केला होता. यावरून केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि ससूनचे डिन यांच्यात शाब्दिक चकमकही उडाली होती. या बैठकीनंतर महापौरांनी हे सर्व खराब व्हेंटिलेटर्स पुणे मनपाच्या ताब्यात घेऊन तंत्रज्ञानामार्फत दुरूस्त करून घेत पुन्हा वापरात आणण्याचे ठरवलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Pune