Home /News /pune /

Pune: पुण्याचे महापौर Murlidhar Mohol अडचणीत, अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश

Pune: पुण्याचे महापौर Murlidhar Mohol अडचणीत, अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश

Pune Mayor Murlidhar Mohol: पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पुणे, 9 डिसेंबर : पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) हे अडचणीत येताना दिसत आहेत. कारण, पुण्यातील न्यायालयाने महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा (case under atrocities act) दाखल कऱण्याचे आदेश दिले आहेत. सार्वजनिक शौचालय, अतिक्रमणावर केलेल्या कारवाई दरम्यान झालेल्या वादानंतर न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करुन एक महिन्यांत अहवाल द्या असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. (Pune court orders file case against Murlidhar Mohol under atrocities act) कोथरूड परिसरात असलेल्या सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम तोडण्याचे निर्देश प्रशासनाने दिले होते. या तोडक कारवाईवरुन वाद झाला होता. या परिसरातील नागरिकांनी आपली जागा सोडून जावे जेणेकरुन तेथे गृहप्रकल्प उभारता यावा यासाठी महापौर मुरलीधर मोहोळ यांनीच ही कारवाई केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये महिला आणि लहान मुलांकडून घरफोडी, संपूर्ण घटना CCTV मध्ये कैद या कारवाई दरम्यान मोठा वाद झाला होता. यानंतर एका व्यक्तीने न्यायालयात याचिका दाखल केलेली. यावर न्यायालयाने सुनावणी करताना पोलिसांना गुन्हा नोंद करुन तपास करण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी अद्याप महापौर मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया समोर आलेली नाहीये. महापौर मुरलीधर मोहोळ यांना विचारले असता त्यांनी म्हटले, या प्रकरणात आपण सविस्तर माहिती घेऊन आपली बाजू लवकरच मांडणार आहोत. ठाकरे सरकारमधील मंत्र्याच्या भावाची भाईगिरी, तरुणाला मारहाण ठाकरे सरकारमधील शिवसेनेचे मंत्री असलेले संदिपान भुमरे (Minister Sandipan Bhumare) यांच्या भावाने एका तरुणाला मारहाण (youth beaten) केल्याचा प्रकार समोर आला आहे. संदिपान भुमरे यांचा भाऊ राजू भुमरे यांनी एका तरुणाला बेदम मारहाण केली आहे. लाकडी दांड्याने राजू भुमरे (Raju Bhumare) यांनी मारहाण केली आहे. मारहाण करत असतानाचा एक फोटोही समोर आला असून तो जोरदार व्हायरल होत आहे. औरंगाबादमधील रस्त्याच्या गैरव्यवहाराबाबत रणजीत नरवडे हा कार्यकर्ता फेसबूक लाईव्ह करत होता. याचाच राग धरुन मंत्री संदिपान भुमरे यांचे भाऊ राजू भुमरे याला बेदम मारहाण केली असल्याचं बोललं जात आहे. रस्त्याच्या कामात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी येत असातनाच रणझीत नरवडे हा फेसबूक लाईव्ह करत होता यावेळी राजू भूमरे यांनी त्याला बेदम मारहाण केली. या घटनेनंतर रणजीत नरवडे याने पाचोड पोलीस ठाण्यात राजू भुमरे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहेत.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Crime news, Pune

पुढील बातम्या