पुण्यात लोकप्रतिनिधींच्या घरीही पोहोचला कोरोना, महापौरांच्या कुटुंबातील 8 जणांना लागण

पुण्यात लोकप्रतिनिधींच्या घरीही पोहोचला कोरोना, महापौरांच्या कुटुंबातील 8 जणांना लागण

पुण्यात लोकप्रतिनिधींना कोरोनाची लागण झाल्यामुळे चिंतेचं वातावरण आहे.

  • Share this:

पुणे, 06 जुलै : पुण्यात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच आहे. पुण्याचे प्रथम नागरिक अर्थात महापौर मुरलीधर मोहोळ यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. आता त्यांच्यासह कुटुंबातील सदस्य सुद्धा कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे. पुण्यात लोकप्रतिनिधींना कोरोनाची लागण झाल्यामुळे चिंतेचं वातावरण आहे.

पुण्याचे महापौर महापौर मुरलीधर मोहोळ यांना 4 जुलै रोजी कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. मुरलीधर मोहोळ यांच्या संपर्कात आलेल्या लोकांची यादी करण्यात आली होती. त्यांच्या कुटुंबीयांचीही कोरोनाची चाचणी घेण्यात  आली होती. यात  मोहोळ कुटुंबातील 8 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

वडिलांचं छत्र हरपलं पण आईची प्रेरणा घेऊन कर्णिकानं परीक्षेत मिळवलं अव्वल यश

4 जुलै रोजी मोहोळ यांनी स्वत: ट्वीट करून आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचं सांगितलं होतं.

'थोडासा ताप आल्याने मी माझी COVIDー19 टेस्ट केली असता, ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती स्थिर असून लवकरच बरा होऊन पुन्हा तुमच्या सेवेत असेल. उपचारादरम्यान सर्व यंत्रणांच्या संपर्कात राहून परिस्थितीचा आढावा घेत राहील, असं ट्वीट मुरलीधर मोहोळ यांनी केलं होतं.

दुसरीकडे भाजपचे माजी आमदार योगेश टिळेकर  यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे 5 जुलै रोजी स्पष्ट झालं होतं. त्यांच्यापाठोपाठ आता राष्ट्रवादीच्या माजी महापौर वैशाली बनकर यांच्या कुटुंबीयातील 9 सदस्यांनाही कोरोना झाल्याचं निष्पन्न झाले आहे.

अनेक राजकीय नेत्यांनाही झाली होती कोरोनाची लागण

राजकीय नेत्यांमध्ये राज्यात सर्वप्रथम राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना कोरोनाची लागण झाली. काही दिवसांच्या उपचारानंतर जितेंद्र आव्हाड या संकटातून सुखरूप बाहेर पडले. त्यानंतर थोड्याच दिवसांमध्ये काँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला.

वेळेच्या 1 तास आधीच शहरात दाखल झाले देवेंद्र फडणवीस, प्रशासनाची तारांबळ

अशोक चव्हाण हे उपचारासाठी नांदेडहून मुंबईत दाखल झाले. यशस्वी उपचारानंतर तेही पुन्हा सुखरूप घरी परतले. त्यानंतर कोणतीही लक्षणं न दिसणाऱ्या धनंजय मुंडे यांनाही कोरोनाची बाधा झाली. सुदैवाने मुंबईतील एका रुग्णालयातील 11 दिवसांच्या उपचारानंतर धनंजय मुंडे यांनीही कोरोनावर मात केली.

संपादन - सचिन साळवे

First published: July 6, 2020, 8:59 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading