• Home
 • »
 • News
 • »
 • pune
 • »
 • महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या आईलाही सेल्फीची भुरळ; लेकासोबतचा फोटो सोशल मीडियात व्हायरल

महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या आईलाही सेल्फीची भुरळ; लेकासोबतचा फोटो सोशल मीडियात व्हायरल

पुण्याचे महापौर (Pune Mayor) मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी काही तासांपूर्वी आपल्या ट्विटर अकाउंटवरून एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांची आई सेल्फी काढताना दिसत आहे. मायलेकाचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल (Viral Photo) होतं आहे.

 • Share this:
  पुणे, 28 सप्टेंबर: मागील जवळपास पावणे दोन वर्षांपासून देशात कोरोना विषाणूनं थैमान घातलं आहे. कोरोना संक्रमणांमुळे सर्वात बाधित शहर म्हणून पुणे बरेच दिवस अव्वल स्थानावर होते. कोरोना संक्रमणाच्या काळात पुण्याचे महापौर आणि भाजप नेते मुरलीधर मोहोळ यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं आहे. कोरोना काळातील त्यांच्या कामामुळे ते अनेकदा चर्चेतही आले होते. पण सध्या ते एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहे. खरंतर, पुण्याचे महापौर (Pune Mayor) मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी काही तासांपूर्वी आपल्या ट्विटर अकाउंटवरून एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांची आई सेल्फी काढताना दिसत आहे. मायलेकाचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल (Viral Photo) होतं आहे. हा  फोटो शेअर करताना मुरलीधर मोहोळ यांनी एक भावनिक कॅप्शन देखील लिहिलं आहे. जेमतेम आकडेमोड येणाऱ्या आईनं अचानक 'चल रे सेल्फी काढू' असं म्हटल्याने मोहोळ यांना देखील आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्यामुळे पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या आईसोबतचा हा अविस्मरणीय क्षण ट्विटरवर शेअर करत, आपल्या आईबद्दल प्रेम व्यक्त केलं आहे. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, 'जेमतेमच अक्षर ओळख असणारी माझी आई 'चल रे सेल्फी काढू' म्हणून 'सरप्राईज' देते तेव्हा... लव्ह यु आई!' मायलेकाचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होतं असून अनेकांनी यावर भावनिक प्रतिक्रिया दिल्या आहेत. हेही वाचा-'माफी मागणारच नाही', महिलेला शिवीगाळ करणाऱ्या भाजप आमदारांचं उत्तर संबंधित फोटोवर प्रतिक्रिया देताना, एका ट्विटर वापरकर्त्यानं लिहिलं की, 'तुमच्या हातून जे काही चांगलं कार्य होतं आहे. त्याचा उगम तुमच्या आई आहेत. त्यामुळेच तुम्ही अवाढव्य ओझं घेऊन न थकता कार्यरत आहात.' तर दुसऱ्या एका वापरकर्त्याने लिहिलं की, 'कोणतीही नवीन गोष्ट शिकायला वयाची मर्यादा नसते, हे खऱ्या अर्थाने पटवून दिलं आहे. सध्या हा फोटो वेगाने व्हायरल होतं असून या ट्विटवर प्रतिक्रियांचा ओघ सुरूच आहे.
  Published by:News18 Desk
  First published: