Home /News /pune /

बाळ पाळण्यात, कोरोना पॉझिटिव्ह आई रुग्णालयात; पुण्यात महिलांनी स्वीकारलं 4 दिवसांच्या लेकराचं मातृत्व

बाळ पाळण्यात, कोरोना पॉझिटिव्ह आई रुग्णालयात; पुण्यात महिलांनी स्वीकारलं 4 दिवसांच्या लेकराचं मातृत्व

4 दिवसांच्या बाळाची आई निघाली कोरोना पॉझिटिव्ह, अखेर ग्रामपंचायतीच्या महिलांनी घेतली जबाबदारी

  मंचर, 11 जून : देशातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. यातच महाराष्ट्र राज्यात सर्वात जास्त कोरोना रुग्ण आहेत. पुण्यातही कोरोनाबाधितांनी 10 हजारांचा आकडा पार केला आहे. अशा परिस्थितीतही मनाला आनंद देणारी बातमी पुण्यातून आली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये एका महिलेनं मुलीला जन्म दिला, मात्र ती कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यामुळं या महिलेला आपल्या मुलीला पाहताही आलं नाही. काही दिवसांनी बाळाची चाचणी निगेटिव्ह आली. मात्र तिचा सांभाळ कोण करणार, असा प्रश्न समोर आल्यानंतर मंचर ग्रामपंचायतीनं या 4 दिवसांच्या बाळाचा सांभाळ करण्याचा निर्णय घेतला. आई दवाखान्यात आणि नातेवाईक क्वारंटाइन असल्यामुळं या बाळाचा सांभाळ करण्याची जबाबदारी मंचर ग्रामपंचायतीनं घेतली. मंचर ग्रामपंचायतीच्या अर्चना बेंडे आणि स्नेहा मिसाळ या दोन महिला कर्मचाऱ्यांनी या 4 दिवसांच्या बाळाला ग्रामपंचायतीत आणलं. या बाळावर पुष्पवृष्टी करून, त्याला पाळण्यात घालून बारसंही केलं. वाचा-कुत्र्याला वाचवण्याच्या केला प्रयत्न, कार विहिरीत कोसळून पत्नीसह मुलांचा मृत्यू मुंबईहून ही महिला 28 मे रोजी प्रसूतीसाठी मंचर येथे आपल्या गावी आली होती. गावी परतल्यानंतर या महिलेची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यावेळी ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं, आणि सगळ्यांना धस्सं झालं. बाळलाही कोरोनाची लागण होईल, या भीतीनं संपूर्ण कुटुंब घाबरलं. 6 जून रोजी या महिलेची प्रसुती झाली आणि तिनं मुलीला जन्म दिला. मात्र आश्चर्याची गोष्ट म्हणजे या बाळाची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली. वाचा-क्या बात! लॉकडाऊनच्या काळात 83 टक्के पुणेकर पोलिसांच्या कामावर खूश बाळाची आई कोरोना पॉझिटिव्ह आल्यानं संपूर्ण कुटुंबाला क्वारंटाइन राहण्यास सांगितले. त्यामुळं बाळाचा सांभाळ कोण करणार असा सवाल उभा राहिला. यावेळी मंचरचे सरपंच दत्ता गांजाळे यांनी पुढाकार घेऊन बाळाचा सांभाळ ग्रामपंचायतीतील महिला करतील, असे सांगितले. सध्या हे बाळ मंचर ग्रामपंचायतीत असून, महिला सदस्य बाळाची काळजी घेत आहे. या महिला कर्मचाऱ्यांनी दाखवलेलं धाडसं, उल्लेखनीय आणि धाडसी आहे.
  एक चमत्कार.... मंचर मध्ये आढळून आलेली covid-19 पॉझिटिव्ह महिलेला सहा जून रोजी कन्यारत्न प्राप्त झाले होते.बाळ जन्मजात... Posted by Archana Bende on Tuesday, June 9, 2020
  सध्या सोशल मीडियावर या बाळाला मंचर ग्रामपंचायतीत आणतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये बाळाच्या स्वागताची जय्यत तयारी केलेली दिसत आहे. वाचा-पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या 10 हजार पार, तरीही नवी आकडेवारी दिलासादायक! संपादन, संकलन-प्रियांका गावडे.
  Published by:Priyanka Gawde
  First published:

  Tags: Corona, Pune news

  पुढील बातम्या