मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

'तुमची लस इथे केव्हा येणार?' थेट Pfizer च्या सीईओला पुणेकराचं पत्र; आणि उत्तरही आलं पाहा

'तुमची लस इथे केव्हा येणार?' थेट Pfizer च्या सीईओला पुणेकराचं पत्र; आणि उत्तरही आलं पाहा

58 वर्षांच्या एका पुणेकराने  'भारतात तुमची लस कधी उपलब्ध होणार,' याची विचारणा करणारा ई-मेल थेट अमेरिकेतल्या फायझर या औषध कंपनीचे अध्यक्ष आणि सीईओ यांना पाठवला. पुण्याच्या पत्राला CEO नी उत्तरही पाठवलं हे विशेष

58 वर्षांच्या एका पुणेकराने 'भारतात तुमची लस कधी उपलब्ध होणार,' याची विचारणा करणारा ई-मेल थेट अमेरिकेतल्या फायझर या औषध कंपनीचे अध्यक्ष आणि सीईओ यांना पाठवला. पुण्याच्या पत्राला CEO नी उत्तरही पाठवलं हे विशेष

58 वर्षांच्या एका पुणेकराने 'भारतात तुमची लस कधी उपलब्ध होणार,' याची विचारणा करणारा ई-मेल थेट अमेरिकेतल्या फायझर या औषध कंपनीचे अध्यक्ष आणि सीईओ यांना पाठवला. पुण्याच्या पत्राला CEO नी उत्तरही पाठवलं हे विशेष

पुणे, 31 मे: पुणे आणि पुणेरी (Pune News) माणसांचे किस्से जगभर प्रसिद्ध आहेत. पुणेरी माणसं वेळ पडल्यास कोणालाही प्रश्न विचारायला मागेपुढे पाहत नाहीत. याची प्रचिती येईल, असा एक प्रसंग नुकताच घडला आहे. सध्या जगभर सर्वत्र कोरोना विषाणूच्या महाभयंकर साथीला रोखण्यासाठी लसीकरण  मोहीम राबवली जात आहे; पण भारतात गेल्या काही दिवसांपासून लशींचा तुटवडा निर्माण झाल्यानं लसीकरण मोहीम मंदावली आहे. अनेकांना लसीचा पहिला डोस (Corona Vaccination Pune) मिळाला आहे; मात्र दुसरा डोस मिळण्यात अडचणी येत आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर, पुण्यात मार्केटिंग क्षेत्रात असलेल्या 58 वर्षीय प्रकाश मिरपुरी यांनी 'भारतात लस कधी उपलब्ध होणार,' याची विचारणा करणारा Email थेट अमेरिकेतल्या फायझर (Pfizer Vaccine) या औषध कंपनीचे अध्यक्ष आणि सीईओ यांना पाठवला. विशेष म्हणजे या पत्राला फायझरचे अध्यक्ष आणि सीईओ अल्बर्ट बोउर्ला (Pfizer CEO responds to Pune resident) यांनी उत्तरही पाठवलं. मिरपुरी यांच्या ई-मेलला अल्बर्ट बोउर्ला यांनी 26 मे रोजी उत्तर पाठवलं. यामध्ये बोउर्ला यांनी मिरपुरी यांच्या प्रकृतीची चौकशी करून फायझरची लस आपल्या कुटुंबासाठी उपलब्ध व्हावी यासाठी ते करत असलेल्या प्रयत्नांचं कौतुकही केलं. कंपनी आवश्यक निकषांची पूर्तता करत लवकरच भारतात लस दाखल करील, असं त्यांनी या पत्रात म्हटलं आहे. शंभरी पार आजीआजोबांनी एकत्र दिला कोरोनाशी लढा; घरीच उपचार घेऊन हरवलं व्हायरसला 'भारतात आमची लस दाखल करण्यासाठी आम्हाला नियामक यंत्रणेची  अद्याप मान्यता मिळालेली नाही; पण आम्ही यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. भारत सरकारच्या लसीकरण कार्यक्रमाकरिता आमची लस उपलब्ध करून देण्यासाठी सरकारशी करार करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत,' असंही त्यांनी या पत्रात म्हटलं आहे. 'इंडिया टुडे'ने दिलेल्या वृत्तानुसार, मिरपुरी यांनी स्वतःसह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची लसीकरणासाठी एक एप्रिलची वेळ घेतली होती; पण तत्पूर्वी 18 मार्च रोजी त्यांना कोविड-19 झाल्याचं स्पष्ट झालं. रुग्णालयात उपचार घेत असताना, त्यांनी जगभरातल्या लशींबाबत माहिती घेतली. वेगवेगळ्या लशी, त्यांची कार्यक्षमता याबद्दल जाणून घेतलं. भारतातल्या, तसंच परदेशातल्या मित्रांच्या संपर्कात राहून त्यातल्या ताज्या घडामोडी ते जाणून घेत राहिले. याच दरम्यान, अमेरिकेतल्या त्यांच्या एका मित्राने फायझरची लस सर्वोत्तम असल्याची माहिती दिली. तेव्हा मिरपुरी यांनी थेट कंपनीलाच, त्यांची लस भारतात कधी येणार याबद्दल विचारण्याचा निर्णय घेतला आणि तसा ई-मेल कंपनीला केला. कोव्हिशिल्डचा फक्त एकच डोस दिला जाणार? लवकर लसीकरण धोरण बदलण्याची शक्यता फायझरसह त्यांनी मॉडर्ना (Moderna) आणि जॉन्सन अँड जॉन्सन्स (Johnson and Johnson) या कंपन्यांही ई-मेल लिहून त्यांची लस भारतात उपलब्ध होण्याबाबत विचारणा केली होती. फायझरकडून त्यांना उत्तरही आलं; पण या लशी भारतात येण्यास वेळ लागणार असल्यानं आता मिरपुरी यांनी स्वत:सह कुटुंबाचंही भारतात उपलब्ध असलेल्या लशींपैकीच एखाद्या लशीचं लसीकरण करून घेण्याचा निर्णय घेतला आहे फायझरनं जुलै ते ऑक्टोबरदरम्यान भारताला 5 कोटी डोस देण्याची तयारी दर्शवली आहे. परंतु लशींच्या चाचण्यांना शिथिलता आणि साइड इफेक्ट्स झाल्यास कंपनीवर कारवाई न होण्याची हमी या फायझरनं घातलेल्या अटी भारताने मान्य केलेल्या नाहीत. पीटीआयनं दिलेल्या वृत्तानुसार, मॉडर्नाकडे सध्या भारतात पाठवण्याएवढे डोसेस उपलब्ध नसल्यानं पुढील वर्षी फक्त एक डोस लागणारी लस भारतात दाखल करण्याच्या दृष्टीनं ती कंपनी तयारी करत आहे.
First published:

Tags: Corona vaccine, Coronavirus, Pune

पुढील बातम्या