पुण्यातील धक्कादायक प्रकार, रागात मालकानं कर्मचाऱ्याच्या प्रायव्हेट पार्टवर टाकलं सॅनिटायझर

पुण्यातील धक्कादायक प्रकार, रागात मालकानं कर्मचाऱ्याच्या प्रायव्हेट पार्टवर टाकलं सॅनिटायझर

पुण्यात खर्चावरून झालेल्या वादात रागात मालकानं कर्मचाऱ्याच्या प्रायव्हेट पार्टवर सॅनिटायझर टाकल्याची धक्कादायक घटना घडली.

  • Share this:

पुणे, 07 जुलै : कोरोनामुळे सध्या सर्वच क्षेत्रांना आर्थिक फटका बसला आहे. यामुळे अनेक व्यापारी, कर्मचारी सध्या चिंतेत आहेत. यातूनच पुण्यात एक भयंकर प्रकार घडला. लॉकडाऊन दरम्यान कंपनीच्या पैशावरून एका व्यक्तीवर तिघांनी मानसिक आणि शारीरिक त्रास दिला. ही घटना कोथरूड येथे घडली, अशी माहिती पोलिसांनी रविवारी दिली. हा वाद एवढा वाढला की मालक आणि काही कर्मचाऱ्यांनी पीडित कर्मचाऱ्याच्या प्रायव्हेट पार्टवर सॅनिटायझर टाकलं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना 13 आणि 14 जून रोजी घडली. मात्र 2 जुलै रोजी या घटनेसंबंधी पौद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारदार एका कंपनीत मॅनेजर म्हणून काम करतो.  ऑफिसच्या कामासाठी तो दिल्लीला रवाना झाला होता, यावेळी त्यानं कंपनीच्या अकाउंटमधून काही पैसे खर्च केले.

वाचा-कोरोना झाल्यानंतरही तू जिवंत कशी? नागरिकांचा महिलेच्या कुटुंबावर बहिष्कार

दरम्यान, 7 मे रोजी पुण्यात परत आल्यानंतर तक्रारदाराच्या मालकाने त्याला 17 दिवस क्वारंटाइन केले. त्याच्याकडे पैसे नसल्याने चेकआऊट करण्यापूर्वी त्याने आपला फोन आणि डेबिट कार्ड गहाण ठेवले, असे त्याच्या एफआयआरमध्ये नोंदवण्यात आले आहे.

वाचा-2021 पर्यंत भारताची कोरोना लस येणार नाही; भारत बायोटेकनेही खोडला ICMR चा दावा

13 जून रोजी कंपनीच्या मालकाने आणि काही साथीदारांनी फिर्यादींकडून पैसे मागितले. पैसे नाही दिल्यावरून त्यांच्यात वाद झाला आणि त्यांनी पीडित तरुणाला कारमध्ये बसवले. कर्मचारी त्याला ऑफिसमध्ये घेऊन गेले. तेव्हा त्याला मालक आणि इतर दोघांनी मारहाण केली. एवढेच नाही तर त्याच्या प्रायव्हेट पार्टवर सॅनिटाझर टाकले, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान तक्रारदाराच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही आहे.

वाचा-एका दिवसाचे 1 लाख रुपये; बिल भरलं नाही म्हणून कोरोना योद्ध्याला ठेवलं ओलीस

Published by: Manoj Khandekar
First published: July 7, 2020, 2:35 PM IST
Tags: pune news

ताज्या बातम्या