• Home
 • »
 • News
 • »
 • pune
 • »
 • पुण्याचा अफलातून पठ्ठ्या, स्वत:ची गाडी उचलून नेल्यानंतर बांधलं थेट बाईकचं स्मारक

पुण्याचा अफलातून पठ्ठ्या, स्वत:ची गाडी उचलून नेल्यानंतर बांधलं थेट बाईकचं स्मारक

पौड रस्ता परिसरातील रहिवासी सचिन धनकुडे यांनी कोथरुड डेपोजवळ आपल्या टू-व्हिलरचं स्मारक बांधलं असून शहरातील रहिवाशांना भेडसावणाऱ्या पार्किंग आणि वाहतुकीच्या समस्यांवर प्रकाश टाकला आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 17 सप्टेंबर : पुणे तिथे काय उणे हे म्हणतात, असाच एक प्रकार समोर आला आहे. वाहतूक पोलिसांनी 15 जून रोजी सचिन धनकुडे यांची टू-व्हिलर कोणत्याही पार्किंगचं उल्लंघन न करता काढून घेतली होती. ही गाडी त्यांना 11 सप्टेंबर रोजी परत करण्यात आली. या गोष्टीचा निषेध म्हणून त्यांनी गणेशोत्सवादरम्यान त्या टू-व्हिलरचं थेट स्मारकचं बांधलं आहे. पौड रस्ता परिसरातील रहिवासी सचिन धनकुडे यांनी कोथरुड डेपोजवळ आपल्या टू-व्हिलरचं स्मारक बांधलं असून शहरातील रहिवाशांना भेडसावणाऱ्या पार्किंग आणि वाहतुकीच्या समस्यांवर प्रकाश टाकला आहे. त्यांनी बांधलेल्या या अनोख्या टू-व्हिलर स्मारकाचे फोट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 15 जून 2021 मध्ये कोणत्याही पार्किंग नियमांचं उल्लंघन केलं नसतानाही वाहतूक पोलिसांनी त्यांची टू-व्हिलर उचलली होती. त्यानंतर तीन महिन्यांनी 11 सप्टेंबरला त्यांनी ती परत करण्यात आली. याच गोष्टींचा निषेध व्यक्त करत त्यांनी गाडीचं स्मारक बांधलं.

  Pune Jobs: विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण पुणे इथे नोकरीची सुवर्णसंधी

  याबाबत बोलताना त्यांनी सांगितलं, की वाहतूक पोलिसांनी माझी गाडी नेल्यानंतर या काळात ती परत मिळवण्यासाठी मला अनेकदा त्यांच्या ऑफिसला जावं लागलं. या काळात मी ट्रॅफिक आणि पार्किंग समस्येचा अभ्यास केला. ही समस्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचं जाणवलं. त्यामुळेच या मोठ्या समस्येकडे प्रशासनाचं लक्ष वेधायचं होतं. ही समस्या कोणत्याही एका एजन्सीद्वारे सोडवता येणार नाही. यासाठी पुणे महानगरपालिका, नगररचना विभाग, वाहतूक पोलीस या सर्वांची ही समस्या सोडवण्यासाठी मदत घ्यावी लागेल. पण दुर्देवाने तसं होत नाही.

  Pune News: पुणे महापालिकेने दिली मोठी खूशखबर! कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर फायदा

  जर प्रशासनाने याची दखल घेतली नाही, तर मी माझ्या खाजगी जमिनीवर स्मारक कायमस्वरुपी तसंच ठेवणार असल्याचंही ते म्हणाले. हा त्रास केवळ रहिवाशांनीच का सहन करावा? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. सचिन धनकुडे यांनी बांधलेल्या अनोख्या टू-व्हिलर स्मारकाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून अनेकांनी त्यांच्या या कृत्यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.
  Published by:Karishma
  First published: