मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

Pune News: बंद खोलीत आढळला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; घातपाताचा संशय, पुण्यात खळबळ

Pune News: बंद खोलीत आढळला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; घातपाताचा संशय, पुण्यात खळबळ

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

Pune Crime News: पुण्यात एका बंद खोलीत महिला आणि पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

पुणे, 7 नोव्हेंबर : पुण्यातील (Pune) मुंढवा परिसरातील केशवनगर (Keshav Nagar) येथील कुंभारवाडा (Kumbharwada) येथे एका घरामध्ये एका पुरूषासह महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. दोघांचे मृतदेह बंद खोलीत आढळून आल्यानं पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. हा धक्कादायक प्रकार  दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला. या प्रकरणाची माहिती मिळताच मुंढवा पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृतकांमध्ये शरद भुजबळ वय वर्षे 47 आणि हेमा नावाच्या 43 वर्षीय महिलेचा समावेश आहे. हेमा या नेपाळच्या रहिवासी असल्याचीही माहिती समोर आली आहे. या दोघांचा अपघाती मृत्यू झाला आहे की, घातपात आहे याबाबत आता विविध तर्क वितर्क लावले जात आहेत. तसेच हा घातपात असल्याचाही प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

वाचा : ऐन दिवाळीत चोरट्यांचा साडेचार लाखांच्या दागिन्यांवर डल्ला

शरद भुजबळ हे एका ट्र्रव्हल्स कंपनीत ड्रायव्हर म्हणून काम करत होते. आज शरद यांच्यासोबत संपर्क होत नसल्याने त्यांच्या मित्राने शरद भुजबळ यांच्या घरी दाखल झाले. यावेळी शरद भुजबळ आणि एका महिलेचा मृतदेह घरात आढळून आला. त्याननंतर या घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली.

शरद भुजबळ आणि हेमा या दोघांचेही मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत. शरद भुजबळ यांच्या घराच्या बाहेर केमिकलचा कॅन आढळून आला आहेत. तसेच त्यांच्या घरातील गॅस सुद्धा सुरूच होता असे प्राथमिक चौकशीत समोर आले आहेत. त्यामुळे हा घातपात होता का? असा संशय येत आहे. दरम्यान, दोघांच्या शवविच्छेदनानंतर मृत्यू मागचं नेमकं कारण काय आहे हे समोर येईल.

पुण्यात IAS अधिकाऱ्याच्या घरात जबरी दरोडा

ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पुण्यातील मुंढवा परिसरात जबरी चोरीची घटना घडली आहे. मुंढवा परिसरात राहणाऱ्या महसूल विभागातील सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकाऱ्याच्या घरात भामट्यांनी डल्ला मारला आहे. यावेळी चोरट्यांनी लक्ष्मीपूजनामध्ये ठेवलेले तब्बल 150 तोळे सोनं आणि अडीच लाख रुपयांची रोकड असा एकूण 43 लाख 50 हजार रुपयांचा ऐवज लांबवला आहे. ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच जबरी चोरी झाल्याने पोलीस प्रशासनही खडबडून जागं झालं आहे. याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून भामट्यांचा शोध घेतला जात आहे.

याप्रकरणी दत्तात्रय संभाजी डोईफोडे यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. डोईफोडे हे महसूल विभागातून निवृत्त झालेले वरिष्ठ अधिकारी आहेत. तर त्यांचे पुत्र सागर दत्तात्रय डोईफोडे हे आयएएस अधिकारी असून सध्या त्यांची नेमणूक जम्मू-काश्मीरमध्ये आहे. दरम्यान गुरुवारी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी डोईफोडे यांनी आपल्या घरातील सर्व सोनं लक्ष्मीपूजनासाठी ठेवलं होतं. चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास खिडकी तोडून आतमध्ये प्रवेश करत 43 लाख 50 हजारांचा ऐवज लंपास केला आहे.

First published:

Tags: Crime, Pune