मराठी बातम्या /बातम्या /पुणे /Pune Hotel Fire: हॉटेलला भीषण आग; संपूर्ण हॉटेल आगीच्या विळख्यात, LIVE VIDEO

Pune Hotel Fire: हॉटेलला भीषण आग; संपूर्ण हॉटेल आगीच्या विळख्यात, LIVE VIDEO

Hotel fire in Yavat Pune: पुणे-सोलापूर मार्गावर एका हॉटेलला भीषण आग लागली आहे.

Hotel fire in Yavat Pune: पुणे-सोलापूर मार्गावर एका हॉटेलला भीषण आग लागली आहे.

Hotel fire in Yavat Pune: पुणे-सोलापूर मार्गावर एका हॉटेलला भीषण आग लागली आहे.

पुणे, 1 जून: दौंड तालुक्यातील पुणे सोलापूर महामार्गा (Pune Solapur Highway)वरील यवत मधील कांचन हॉटेल (Kanchan Hotel)ला भीषण आग लागली आहे. हे हॉटेल आतमधून पूर्ण लाकडाने तयार करण्यात आल्याने आग झपाट्याने पसरली आणि अवघ्या काही क्षणातच संपूर्ण हॉटेल आगीच्या विळख्यात आले. आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले जात आहे.

आग विजविण्यासाठी कुरकुंभ औद्योगिक वसाहती मधील अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली आहे. आग नेमकी कशा मुळे लागली हे समजू शकले नाही. या आगीत जीवितहानी झाली नाही मात्र हॉटेलचे मोठे नुकसान झाले आहे.

अग्निशमन दलाच्यासोबतच स्थानिक नागरिकांच्या मदतीने आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या आगीमुळे हॉटेलचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाहीये.

Weather Forecast: पुढील 3 तासांत पुण्यासह या जिल्ह्यांत मुसळधार पाऊस; हवामान खात्याकडून हाय अलर्ट

या हॉटेलच्या आतमध्ये मोठ्या प्रमाणात लाकडाचा वापर करण्यात आला होता. लाकूड मोठ्या प्रमाणात असल्याने अवघ्या काही क्षणातच आग झपाट्याने पसरली आणि बघता बघता संपूर्ण हॉटेल आगीच्या विळख्यात सापडले. या आगीचे व्हिडीओ आणि फोटोज समोर आले आहेत त्यावरून आग किती भीषण होती हे लक्षात येते.

First published:
top videos

    Tags: Fire, Pune