मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

पुण्यात नऱ्हे सेल्फी पॉईंटजवळ भीषण अपघात, कंटेनर थेट हॉटेलला धडकला, थरारक अपघाताचा LIVE VIDEO

पुण्यात नऱ्हे सेल्फी पॉईंटजवळ भीषण अपघात, कंटेनर थेट हॉटेलला धडकला, थरारक अपघाताचा LIVE VIDEO

पुण्यात नऱ्हे सेल्फी पॉईंटजवळ भीषण अपघात, कंटेनर थेट हॉटेलवर धडकला, थरारक अपघाताचा LIVE VIDEO

पुण्यात नऱ्हे सेल्फी पॉईंटजवळ भीषण अपघात, कंटेनर थेट हॉटेलवर धडकला, थरारक अपघाताचा LIVE VIDEO

Pune accident CCTV: पुण्यातील नऱ्हे सेल्फी पॉईंटजवळ पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे.

पुणे, 29 ऑक्टोबर : पुण्यातील अपघातांची (Pune accident) मालिका सुरुच असल्याचं पहायला मिळत आहे. पुणे - बंगळुरू महामार्गावर (Pune Banglore highway) नऱ्हे सेल्फी पॉईंटजवळ पुन्हा एकदा भीषण (accident near Narhe selfie point) अपघात झाला आहे. भरधाव कंटेनर हायवेवरुन थेट सर्व्हिस रोडच्या हॉटेलवर धडकला आहे. ही संपूर्ण घटना हॉटेलच्या सीसीटीव्हीत (Pune accident cctv) कैद झाली असून त्याचा व्हिडीओ आता समोर आला आहे.

नवले ब्रीजवर पुन्हा अपघातांची मालिका

गेल्या आठवड्यात याच परिसरात लागोपाठ तीन अपघात झाले होते. सलग तीन दिवस अपघात झाल्याने पुण्यातला नऱ्हे सेल्फी पॉईंट जवळचा नवले ब्रीज अपघात डेथ स्पॉट पुन्हा एकदा चर्चेत आला. आजपर्यंत 52 लोकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला अपघात डेथस्पॉट दुरूस्त करण्यासाठी नँशनल हायवे अथॉरिटीकडून कोणतेच प्रयत्न होताना दिसत नसल्याने स्थानिकांनी आंदोलनही केलं आहे.

गेल्या आठवड्यात विचित्र अपघात

21 ऑक्टोबर 2021 रोजी नवले पुल परिसरातील सेल्फी पॉइंट जवळ झालेल्या विचित्र अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाले होते. ही घटना गुरुवारी सायंकाळी पाच वाजणेच्या सुमारास घडली. सातारा दिशेकडून मुंबई दिशेकडे निघालेल्या एका कंटेनरने पिकअप वाहनाला धडक दिली. त्यामुळे पिकअप वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने तीन दुचाकीना पिकअपची धडक बसली. जखमींना नऱ्हे गावाचे उपसरपंच सागर भूमकर, डॉ. एन बी आहेर व कार्यकर्त्यांनी उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमल्याने वाहतूक कोंडी झाली होती.

वाचा : महाराष्ट्र बँकेवर भरदिवसा दरोडा, कोट्यवधींचे सोने आणि रक्कम लंपास, घटनेचा CCTV

शनिवारी (23 ऑक्टोबर 2021) झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला होता तर 13 जण गंभीर जखमी झाले होते. इथेनॉल वाहून नेणाऱ्या टँकरने टेम्पो ट्रँव्हलरला जोरात धडक दिल्याने अपघातग्रस्त गाडी थेट हायवे पुलावरून उडून खाली सर्विस रोडवर येऊन पडली होती. हा अपघात इतका भीषण होता. या ब्लँक स्पॉटवर आजवर पन्नासच्या वर बळी गेलेत तरीही हायवे अँथॉरिटी अधिकारी या तीव्र उतारावर स्पीड ब्रेकर बसवत नाहीयेत त्यामुळेच इथं वारंवार अपघात होत असल्याचे पोलिसांचं आणि स्थानिकांचं म्हणणं आहे.

या परिसरात नेहमीच अपघात घडतात

नवीन कात्रज बोगदा पार केल्यानंतर पुण्याच्या दिशेने जाताना तीव्र उतार असल्याने सुसाट जाणाऱ्या मालवाहतूक वाहनांना ब्रेक लागणे अशक्य होते. ब्रेक फेल झाल्याने या परिसरात वारंवार अपघात होऊन अनेकांना जीव गमवावा लागला आहे. मात्र याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्रशासन हे उपाययोजना करण्याऐवजी फक्त बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

First published:

Tags: Accident, Cctv footage, Pune