मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

पुणेकरांसाठी खूशखबर! आता मेट्रोतून सायकलसह प्रवास करता येणार, महामेट्रोची मोठी घोषणा

पुणेकरांसाठी खूशखबर! आता मेट्रोतून सायकलसह प्रवास करता येणार, महामेट्रोची मोठी घोषणा

Pune Mahametro news: आता सायकल प्रेमींना मेट्रोमधून देखील सायकल (bicycle in metro) घेवून प्रवास करता येणार आहे. यासाठी सायकलीचे आगाऊ पैसे आकारले जाणार नाहीत.

  • Published by:  News18 Desk

पुणे, 08 मार्च : सध्या देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींनी आकाशाला गवसणी घातली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना याचा जबरदस्त फटका बसत आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढलेल्या किमती खिशाला परवड नाहीत, त्यामुळे अनेकांनी आता सायकलने (Bicycle) प्रवास करायला सुरुवात केली आहे. तर अनेकजण खाजगी वाहनांऐवजी सार्वजनिक वाहनांना पसंती देत आहेत. अशात आता सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.

आता सायकल प्रेमींना मेट्रोमधून (bicycle in metro) देखील सायकल घेवून प्रवास करता येणार आहे. तसेच या सायकलीचे आगाऊ पैसे आकारले जाणार नाहीत. त्यामुळे देशात इंधनाच्या वाढलेल्या दरांच्या पार्श्वभूमीवर सायकल प्रवासाला चालना देण्यासाठी हा निर्णय महत्त्वपूर्ण समजला जात आहे. शहरातील सर्व वयोगटांतील लोक आपली सायकल घेवून मेट्रोनं प्रवास करू शकणार आहेत, अशी माहिती महामेट्रोचे महाव्यवस्थापक हेमंत सोनवणे यांनी दिली आहे.

त्यांनी पुढे सांगितलं की, 'नागपूरमध्ये सध्या सायकलप्रेमींसह विद्यार्थ्यांना सायकलसह मेट्रोमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे शहरातील विद्यार्थी, नोकरदार, महिला अशा सर्वच वयोगटातील व्यक्तींना आणि सायकलप्रेमींना  मेट्रोमधून सायकल घेवून प्रवास करण्याची परवानगी देण्यात येणार आहे. यासाठी वाढील शुल्क आकारलं जाणार नाही अशी माहितीही महामेट्रोनं दिली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात पुणेकरांच्या खिशावरील ताण कमी होणार आहे.

हे ही वाचा - अजित पवारांचा धडाका सुरूच, पहिल्याच बैठकीत बदललं 'पुणे मेट्रो'चं नाव

पुणे शहरात विविध शैक्षणिक संस्था, आयटी कंपन्यां आणि इतर व्यवसायांचं मोठं जाळं आहे. त्यामुळे पुण्यात शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि आयटी कंपन्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या लाखांच्या घरात आहे. त्यामुळे या वयोगटातील लोकांच्या सायकल चालवण्याच्या चळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असल्याची माहितीही महामेट्रोचे महाव्यवस्थापक हेमंत सोनवणे यांनी दिली आहे. हा निर्णय पुणेकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहेच, पण यामुळे शहराचं आरोग्यही संतुलित राहणार आहे. कारण सायकल वापरामुळे शहरातील वाढतं प्रदूषण कमी व्हायला मदत होणार आहे.

First published:

Tags: Maharashtra News, Pune metro