मराठी बातम्या /बातम्या /पुणे /कसब्यानंतर आता पुण्याची लढाई, लोकसभा निवडणुकीचा इतिहास काय आहे?

कसब्यानंतर आता पुण्याची लढाई, लोकसभा निवडणुकीचा इतिहास काय आहे?

पुण्याच्या लोकसभा निवडणुकांचा इतिहास

पुण्याच्या लोकसभा निवडणुकांचा इतिहास

पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनाने पुणे लोकसभेसाठी निवडणुका होण्याची शक्यता आहे.

वैभव सोनवणे, प्रतिनिधी

पुणे, 1 एप्रिल : पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनाने पुणे लोकसभेसाठी निवडणुका होण्याची शक्यता आहे. लोकसभा विसर्जित होण्यासाठी एक वर्षापेक्षा अधिकचा कालावधी असेल तर निवडणूक घ्यावी लागते, त्यामुळे पुण्याची लोकसभा निवडणूक होण्याची शक्यता दाट आहे. आता निवडणूक होणार म्हटलं की उमेदवार कोण ? कुठले पक्ष निवडणुक लढवणार ? असे प्रश्न आपसूकच येतील. पण त्यापूर्वी आपण पुणे लोकसभेचा इतिहास जाणून घेऊया.

स्वतंत्र भारतात पुण्याची पहिली लोकसभा निवडणूक लढवली गेली ती 1951 साली तेव्हापासून ते आतापर्यंत ही लोकसभा सर्वाधिक काळ काँग्रेसच्या ताब्यात राहिली आहे, तर भाजपने तीन वेळा पुण्याला खासदार दिला आहे.

हद्द झाली! बापट यांच्या निधनानंतर 48 तासांत भावी खासदाराचं बॅनर, भाजप नेता ट्रोल

कोण होते पुण्याचे खासदार?

1951 साली पुण्यातून झालेल्या लोकसभा मतदारसंघातून नरहर गाडगीळ आणि इंदिरा मायदेव हे दोन खासदार काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आले होते.

1957 साली प्रजा समाजवादी पक्षाचे नारायण गोरे निवडून आले होते.

1962 ला पुन्हा काँग्रेसने मतदारसंघ राखत शंकरराव मोरे हे खासदार झाले होते.

1967 ला संयुक्त समाजवादी पार्टीचे श्रीधर जोशी हे खासदार झाले.

त्यानंतर 1971 ते 1980 अशी दहा वर्ष मोहन धारिया हे आधी काँग्रेसकडून आणि नंतर जनता पक्षाकडून खासदार झाले .

1980 नंतर मात्र सलग तीन निवडणुका 1980, 1984, 1989 ला विठ्ठलराव गाडगीळ यांनी काँग्रेसकडून लढून एकहाती वर्चस्व मतदार संघावर मिळवलं होतं.

1991 ला पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीकडून अण्णा जोशी हे पुण्याचे खासदार झाले .

1996 ला मात्र काँग्रेसने पुन्हा मतदार संघ जिंकून सुरेश कलमाडी खासदार झाले .

1996 नंतर पुन्हा 1998 ला झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने कलमाडींच्या ऐवजी विठ्ठलराव तुपेना उमेदवारी दिली आणि तुपे खासदार झाले.

1999 ला झालेल्या निवडणुकीत मात्र भाजपने प्रदीप रावत यांच्या रूपाने मतदारसंघात खासदार निवडून आणला.

2004, 2009 साली झालेल्या निवडणुकीत दोन्ही वेळा काँग्रेसकडून कलमाडी हे खासदार म्हणून निवडून गेले.

2014 ला मात्र नरेंद्र मोदींच्या लाटेत अनिल शिरोळे आणि नंतर 2019 ला गिरीश बापट हे पुण्याचे खासदार झाले.

गिरीश बापट यांच्या निधनाने रिक्त झालेल्या पुणे लोकसभा मतदारसंघात आता नवीन खासदार कोण असा प्रश्न असणार आहे?

First published:
top videos

    Tags: Pune