मराठी बातम्या /बातम्या /पुणे /पुण्यात व्यापारी वर्ग अस्वस्थ, मुख्यमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी

पुण्यात व्यापारी वर्ग अस्वस्थ, मुख्यमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी

Pune Lockdown: लॉकडाऊनमुळे अनेक व्यवसाय ठप्प झालेत. व्यवसाय बंद असल्यानं व्यावसायिकांचे आर्थिक व्यवहार कोलमडले आहेत.

Pune Lockdown: लॉकडाऊनमुळे अनेक व्यवसाय ठप्प झालेत. व्यवसाय बंद असल्यानं व्यावसायिकांचे आर्थिक व्यवहार कोलमडले आहेत.

Pune Lockdown: लॉकडाऊनमुळे अनेक व्यवसाय ठप्प झालेत. व्यवसाय बंद असल्यानं व्यावसायिकांचे आर्थिक व्यवहार कोलमडले आहेत.

पुणे, 23 मे: सध्या राज्या 1 जूनपर्यंत लॉकडाऊन आहे. लॉकडाऊनमुळे (Lockdown) अनेक व्यवसाय ठप्प झालेत. व्यवसाय बंद असल्यानं व्यावसायिकांचे आर्थिक व्यवहार कोलमडले आहेत. याच पार्श्वभूमीवर 1 जूननंतर लॉकडाऊनमध्ये वाढ न करता दुकानं उघडण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी आता पुण्यातल्या (Pune) व्यापाऱ्यांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे करण्यात आली आहे. पुणे व्यापारी (Pune Traders) महासंघानं एक निवेदन देऊन ही मागणी केलंय.

लॉकडाऊनच्या काळात गुढी पाडवा, अक्षयतृतीया, ईद हे सण होऊन गेले. त्यामुळे व्यापारी आणि व्यावसायिकांचं यात बरंच आर्थिक नुकसान झालं. तसंच अजूनही लॉकडाऊन असल्यानं अधिक आर्थिक हानी होत असल्याचं महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका आणि सचिव महेंद्र पितळीया यांनी म्हटलं आहे.

व्यापारी महासंघानं काय म्हटलं निवदेनात

अर्थव्यवस्थेचा कणा म्हणजे व्यापारी वर्ग. राज्याच्या महसूलात व्यापारी वर्गाचं मोठं योगदान आहे. मात्र कोरोनाच्या परिस्थितीत हे क्षेत्र अडचणीत आले आहे. व्यापाऱ्यांच्या हाती काहीही उत्पन्न नसताना देखील त्यांनी दोन महिने कर्मचाऱ्यांचे पगार त्यांना दिले. मात्र आता आर्थिक अडचण भासू लागल्यानं कर्मचाऱ्यांना पगार देणंही अशक्य झालं आहे. तर काम आणि उत्पन्न नसल्यानं अनेक कर्मचाऱ्यांवर नोकरी गमावण्याची वेळ आली आहे.

हेही वाचा- Barge P305: कसे होते 'ते' समुद्रातील 9 तास, अनिल वायचाल यांचा थरारक अनुभव

या परिस्थितीत बेरोजगारी वाढत आहे. व्यापारी, कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. त्यामुळे 1 जूननंतर व्यापाऱ्यांना व्यापार सुरु करण्याची परवानगी द्यावी. परवानगी नसताना ई- कॉमर्स कंपन्या राजरोसपणे जीवनाश्यक वस्तू व्यतिरिक्त वस्तूंचा व्यवसाय करताहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांवर तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करण्याची वेळ आली आहे.

हेही वाचा- गोवा सरकारचं ठरलं, 10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी घेतला 'हा' मोठा निर्णय

दरम्यान व्यापार क्षेत्र टिकवण्यासाठी सरकारकडून मदतीची आणि सहाकार्याची गरज आहे. त्यामुळे सरकारनं व्यापाऱ्यांचं तीन महिन्याचं वीज बिल आणि बँक कर्जावरील व्याज माफ करावं. तसंच स्थानिक मालमत्ता कर माफ करण्याची गरज आहे. व्यापाऱ्यांनीही परिस्थितीचं गांभीर्य ओळखून सरकारला सर्वोतोपरी सहकार्य केलं आहे.

First published:

Tags: Coronavirus, Lockdown, Pune