पुण्यात आज लॉकडाऊन शिथिल, मटन विक्रीची दुकाने किती वाजेपर्यंत राहणार सुरू?

पुण्यात आज लॉकडाऊन शिथिल, मटन विक्रीची दुकाने किती वाजेपर्यंत राहणार सुरू?

एक दिवसाच्या कडकडीत बंदनंतर आता पुणेकरांना रविवारी थोडा दिलासा मिळणार आहे.

  • Share this:

पुणे, 19 जुलै: गेल्या काही दिवसात coronavirus चा संसर्ग वेगाने वाढत असल्याने 13 जुलैपासून पुण्यात कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार जीवनावश्यक वस्तूंमध्ये मोडणाऱ्या किराणा आणि भाजीपाल्याची दुकानंही पहिले काही दिवस बंद होती. या कडकडीत बंदनंतर आता पुणेकरांना रविवारी थोडा दिलासा मिळणार आहे. एक दिवसापुरता लॉकडाऊन शिथिल करण्याचा आदेश महापालिका आयुक्तांनी दिला आहे.

आज 19 जुलैला गटारी अमावास्यानिमित्त मटन शॉप आणि किराणा दुकानं दिवसभर खुली राहणार आहेत. पाच दिवसांच्या लॉकडाऊननंतर रविवारी दुकानांसमोर होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन वेळेचे निर्बंध हटवण्यात आले आहेत.  सकाळी 8 ते संध्याकाळी 6 पर्यंत मटण, मच्छीसह सर्व किराणा आणि भाजीपाल्याची दुकाननं उघडी राहतील. ही सवलत फक्त रविवारपुरती आहे. पालकमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी ही सूट दिली आहे.

मुंबईत लाखाचा टप्पा पार, तर राज्यात झाले 3 लाख रुग्ण; Coronavirus ची दहशत कायम

श्रावण सुरू व्हायच्या आधीचा शेवटचा रविवार म्हणून गटारी अमावास्येच्या दिवशी मास, मच्छी, मटन, अंडी याच्या खरेदीसाठी रविवारी ग्राहकांची मोठी गर्दी होऊ शकते, अशातच दुकानांची वेळ मर्यादीत ठेवली तर सोशल डिस्टंटचा फज्जा उडू शकतो, या पार्श्वभूमीवर प्रशासनानं दुकानं दिवसभर खुली ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सकाळी 8 ते 12 या मर्यादित वेळेतच आठवडाभर दुकानं उघडी ठेवायला मुभा होती. त्यात आता रविवारी बदल होईल.

मोठी बातमी! स्वदेशी कोरोना लशीच्या पहिल्या चाचणीसाठी महाराष्ट्रात 60 जण तयार

यंदा आषाढी अमावस्या अर्थात गटारी योगायोगानं रविवारी आली आहे. मटन विक्रीच्या वेळेत वाढ करून देण्यात यावी, अशी मागणी पुणे मटन दुकानदार असोसिएशन आणि अखिल भारतीय खाटीक समाजाने केली होती. येत्या 21 जुलैपासून श्रावण महिना सुरु होत आहे. 20 जुलैला सोमवती आमावस्या आहे. त्यामुळे 19 जुलैला रविवार येत असून आषाढ आमवस्येला मटन विक्री मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे त्या दिवशी मटण विक्रीच्या वेळेत वाढ करण्याची मागणी अखिल भारतीय खाटीक समाज पुणे अध्यक्ष सिद्धेश कांबळे यांनी केली होती.

लॉकडाऊनमुळे मटण दुकानदार आर्थिक अडचणीत आले आहेत. त्यामुळे रविवारी मटन दुकानदारांचे आर्थिक नुकसान भरुन निघणार आहे. यासंदर्भात पुणे मटन दुकानदार असोसिएशन आणि अखिल भारतीय खाटीक समाजाकडून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जिल्हा प्रशासनाला निवेदनही देण्यात आले होते.

Published by: Arundhati Ranade Joshi
First published: July 18, 2020, 8:45 PM IST

ताज्या बातम्या