पुणे, 26 जून : कोरोनाची (corona) लाट ओसरल्यामुळे पुण्यात (pune) निर्बंध शिथिल करण्यात आले होते. पण, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे पुणे शहराची लेव्हल 3 मध्ये नोंद झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा निर्बंध कडक करण्यात आले असून एकाप्रकारे मिनी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. सोमवारपासून शहरात 7 ते 4 वाजेपर्यंतच दुकानं सुरू राहणार आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असतानाच आता डेल्टा (Delta variant of Coronavirus) आणि डेल्टा प्लस या कोरोना विषाणूने (Delta Plus variant of Coronavirus) सर्वांची चिंता वाढवली आहे. पुणे शहरात कोरोना प्रतिबंधित नियम पुन्हा कडक करण्यात आले आहे. सोमवारपासून अत्यावश्यक सेवेतील दुकाने सोडून सर्व दुकाने 4 पर्यंत खुली राहणार आहे. यात मॉल्स हे पूर्णपणे बंद राहणार आहे.
तर हॉटेल्सही 4 वाजेपर्यंत खुली राहणार आहे.
पुण्यात काय राहणार सुरू, काय बंद?- पुणे महापालिका क्षेत्रातील सर्व अत्यावश्यक सेवा अंतर्गत दुकाने आठवड्यात सर्व दुकाने दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहणार- अत्यावश्यक सेवा व्यतिरिक्त सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार 4 वाजेपर्यंत सुरू तर शनिवार रविवार पुर्णपणे बंद- मॉल्स, सिनेमागृहं संपुर्ण बंद. - रेस्टॉरंट, बार, फुड कोर्ट सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 वाजेपर्यंत आसनक्षमतेच्या पन्नास टक्के क्षमतेने आणि शनिवाररविवार फक्त पार्सल सेवा 11 पर्यंत.- उद्याने, मैदाने, जॉगिंग, रनिंग आठवड्यील सर्व दिवस पहाटे 5 ते सकाळी 9 वाजेपर्यंत- खाजगी कार्यालयं कामाच्या दिवशी पन्नास टक्के क्षमतेने दुपारी 4 वाजेपर्यंत - अत्यावश्यक सेवा संबंधी शासकीय कार्यालयं शंभर टक्के क्षमतेने- हे नवीन नियम सोमवारपासून लागू होणार
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.