पुणेकरांसाठी सर्वात महत्त्वाची बातमी, नव्या नियमावलीची आज होणार घोषणा

पुणेकरांसाठी सर्वात महत्त्वाची बातमी, नव्या नियमावलीची आज होणार घोषणा

. मुंबई पाठोपाठ पुण्यात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आहे. त्यामुळे लॉकडाउनची 100 टक्के अंमलबजावणी दोन्ही शहरात करण्यात आली.

  • Share this:

पुणे, 02 जून : देशभरात लॉकडाउन 5 लागू झाला आहे. पाचवा लॉकडाउन हा अनलॉक 1 असल्याचं सांगितलं जात आहे. राज्यातही लॉकडाउन पाचसाठी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. सर्वाधिक रुग्ण आढळलेल्या पुणे शहरात आज कंटेनमेंट झोन्स आणि नियमावली आज जाहीर होणार आहे.

महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. मुंबई पाठोपाठ पुण्यात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आहे. त्यामुळे लॉकडाउनची 100 टक्के अंमलबजावणी दोन्ही शहरात करण्यात आली.

हेही वाचा- फडणवीसांना ठाकरे सरकारचा पुन्हा दणका, 'हा' निर्णय घेत दिला धोबीपछाड

परंतु, आता लॉकडाउनच्या पाचव्या टप्प्यात केंद्र आणि राज्य सरकारच्या अनलॉक 1 आणि बिगीन अगेन नियमावली जाहीर झाली आहे. पुणे शहरातील कंटेनमेंट झोन्स आणि जिल्ह्यासाठी नवीन नियमावली आज जाहीर होणार आहे.  केंद्राकडून मिळालेल्या सूचनेनंतर राज सरकारने राज्यातील वेगवेगळ्या भागात कसे निर्णय घेता येतील, याबद्दल नियमावली तयार केली आहे. ज्या त्या भागातील परिस्थितीत पाहून निर्णय घेतले जाणार आहे. याबद्दल जिल्हाधिकारी घोषणा करणार आहे.

5 जूनपासून महात्मा फुले मंडई आणि महिलांचे खरेदीचे आवडते ठिकाण तुळशीबाग  उघडणार आहेत. तसंच शहरात ज्या भागात कोरोनाचे रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी झाले आहे. अशा भागासाठीही नवीन नियम लागू होणार आहे. त्याआधी पुण्यातील नागरिकांसाठी सोमवारी एक निर्णय घेण्यात आला होता.

त्यानुसार, पुणेकर आता नियमांचं आणि अटींचं पालन करून बाहेर पडू शकतात. उद्याने, मैदाने यावर मोकळेपणाने त्यांना फिरता येणार आहे. यासाठी प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील 150 उद्याने मंगळवार 2 जून पासून खुली व्हायची शक्यता आहे. सकाळी 5 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत उद्यानं उघडी असतील असं सांगण्यात आलं आहे. पण यावेळी मास्क लावणे आवश्यक असेल. मात्र, लहान मुले आणि जेष्ठ नागरिक यांना उद्यानात प्रवेशबंदी असणार आहे.

राज्यातील इतर भागात दुकानं उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. एकदिवस आड रस्त्याच्या बाजूला असलेली दुकानं उघडण्यात येणार आहे. आता पुण्यात दुकानांसाठी याच नियमाने उघडण्यास परवानगी मिळणार आहे. याबद्दल निर्णय आज जाहीर होणार आहे.

हेही वाचा- OMG! ...आणि पाहता पाहता 20 फूट अजगरानं गिळला मोर, VIDEO VIRAL

पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 7826 वर

दरम्यान,  पुणे शहर आणि जिल्ह्यात 1 जून रोजी दिवसभरात कोरोनाबाधित 76 रुग्ण आढळून आले आहे. तर 6 जणांचा मृत्यू झाला आहे.  पुणे शहरात 1 जून रोजी 64 रुग्ण वाढले तर पिंपरी चिंचवड परिसरात 5 आणि जिल्हा रुग्णालय, छावणी परिसरात 3 रुग्ण आढळले आहे. एकीकडे रुग्णांची संख्या वाढत असली तरी  पुण्यात काल दिवसभरात 168 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे.

सध्या जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या 7826 वर पोहोचली आहे. तर 347 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.एनआयव्हीमध्ये वैद्यकीय चाचण्यांचे अहवाल प्रलंबित राहिल्याने बाधित रुग्णांचा आकडा घटला आहे.

संपादन - सचिन साळवे

First published: June 2, 2020, 8:59 AM IST

ताज्या बातम्या