Home /News /pune /

''आदित्य दादा, त्यांना त्यांच्या घरामधून बाहेर काढू नका Please'', पर्यटनमंत्र्यांना चिमुकलीचं पत्र

''आदित्य दादा, त्यांना त्यांच्या घरामधून बाहेर काढू नका Please'', पर्यटनमंत्र्यांना चिमुकलीचं पत्र

पुण्यातल्या (Pune) एका चिमुकलीनं राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना पत्र लिहिलं आहे. चिमुकलीचं हे पत्र सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे.

    पुणे, 20 जून: पुण्यातल्या (Pune) एका चिमुकलीनं राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना पत्र लिहिलं आहे. या चिमुकलीनं राजगड किल्ल्यावर रोपवे बांधू नका, अशी मागणी या पत्राद्वारे (Letter) केली आहे. चिमुकलीचं हे पत्र सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. पुणे जिल्ह्यातल्या एकाविरा देवी मंदिर आणि राजगड किल्ल्यावर पर्यटकांसाठी रोप- वेची सुविधा उपलब्ध होणार आहे. सह्याद्री अतिथीगृहावर आदित्य ठाकरे आणि राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत या करारावर सह्या करण्यात आल्या. पर्यटन विभागाकडून हा रोपवे बनवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र हा रोपवे बांधू नये अशी मागणी एका चिमुकलीनं केली आहे. त्यासाठी तिनं थेट आदित्य ठाकरेंना पत्र लिहिलं आहे. ही छोटी मुलगी गडप्रेमी आणि ट्रेकर असून साईषा अभिजीत धुमाळ असं तिचं नाव आहे. साईषानं काय लिहिलं आहे पत्रात माननीय आदित्य दादा यांस पत्रास कारण की, राजगडावर रोपवे बांधू नका. कारण गडावर आणि आजूबाजूला फुलपाखरु, हरण, मोर, ससे यांची घरं असतात. आपण गर्दी केली तर हे सगळे तिथून निघून जातील. त्यांना त्यांच्या घरामधून बाहेर काढू नका Please. मला ट्रेकिंगला गेल्यावर त्यांना लपून पाहायला, फुलपाखरांच्या मागे धावायला आवडतं. आपण त्यांना आपल्या घरी राहू देत नाही. मग त्यांना त्यांच्या घरामधून बाहेर पाठवतो. मी एक छोटी गडप्रेमी आणि ट्रेकर साईषा अभिजीत धुमाळ. हेही वाचा- पुण्यात तुफान गर्दी करणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल साईषानं हे पत्र महाराष्ट्र मुख्यमंत्री कार्यालयाच्या पत्त्यावर पाठवलं आहे. हे पत्र सध्या सोशल मीडियावर बरंच व्हायरल होतं आहे. आता या पत्राला आदित्य ठाकरे कसा प्रतिसाद देतात हे पाहणं औत्सुक्याचं नक्कीच ठरेल.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Aaditya thackeray

    पुढील बातम्या