Home /News /pune /

Leopard attack live video: पुण्यात बंगल्याच्या दरवाजात बसलेल्या पाळीव कुत्र्याचा बिबट्याने पाडला फडशा

Leopard attack live video: पुण्यात बंगल्याच्या दरवाजात बसलेल्या पाळीव कुत्र्याचा बिबट्याने पाडला फडशा

Leopard attack on dog incident caught in cctv: पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात एका बिबट्याने कुत्र्यावर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

पुणे, 8 जानेवारी : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागांत बिबट्याचा (leopard) वावर असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. इतकेच नाही तर अनेक ठिकाणी बिबट्याने बकरी, माणसांवर हल्ला केल्याच्याही घटना घडल्या आहेत. त्याच दरम्यान आता पुणे जिल्ह्यातून बिबट्याच्या हल्ल्याचा एक थरारक व्हिडीओ (shocking video of leopard attack) समोर आला आहे. दबा धरून बसलेला बिबट थेट बंगल्याच्या दरवाजात आला आणि पाळीव कुत्र्याला तोंडात पकडून धूम ठोकली. दबा धरून बसलेला बिबट थेट बंगल्याच्या दरवाजात आला आणि सुरक्षा करणाऱ्या कुत्र्यालाच तोंडात पकडून धुम ठोकल्याची थरारक घटना आज पहाटे पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात (Aambegaon Taluka Pune) घडली आहे. आंबेगाव तालुक्यातील लाखनगाव येथे सतीश रोडे या शेतकऱ्याच्या पाळीव कुत्र्यावर बिबट्याने आज पहाटे हल्ला करत कुत्र्याचा फडशा पाडला आहे. हल्ल्याचा हा सर्व थरार सीसीटीव्हीत चित्रित झाला असून बिबट्यांच्या वाढत्या दहशतीने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या बिबट्याला जेरबंद करण्याचं मोठ आव्हान आता वनविभागापुढे असणार आहे. अहमदनगरमध्ये बिबट्याचा धुमाकूळ, भरवस्तीत चौघांवर हल्ला अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात भरवस्तीत बिबट्या शिरल्याची घटना गेल्या महिन्यात घडली होती. या बिबट्याने चौघांवर व्यक्तीवर हल्ला केला आहे. बिबट्याने केलेल्या हल्ल्यात चौघेजण जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल कऱण्यात आले होते. बिबट्याने एका व्यक्तीवर हल्ला केल्याचा LIVE VIDEO समोर (Leopard attack live video) आला होता. या व्हिडीओत दिसत आहे की, बिबट्या त्या इसमावर झटप घेतो. श्रीरामपूर शहरातील मोरगे वस्तीत बिबट्या शिरला होता. भरवस्तीत बिबट्या शिरल्याने नागरिकही चकीत झाले आणि धावपळ सुरू झाली. याच दरम्यान बघ्यांनीही मोठी गर्दी केली होती. यावेळी बिबट्याने केलेल्या हल्ल्यात चौघेजण जखमी झाले आहेत. वस्तीत बिबट्या शिरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सिंधुदुर्गात बिबट्याची दहशत; घराबाहेरील कुत्र्याचा पाडला फडशा सिंधुदुर्गात (Sindhudurg) बिबट्याने कुत्र्याचा फडशा पाडल्याची घटना (Leopard attack on dog) समोर आली आहे. ही संपूर्ण घटना घराबाहेरील सीसीटीव्हीत कैद (leopard attack caught in CCTV) झाली आहे. सिंधुदुर्गातील मालवण विरण बाजार येथे 26 ऑक्टोबरच्या मध्यरात्री विजय बेलवलकर यांच्या घराच्या अंगणात येऊन बिबट्याने कुत्र्याचा फडशा पाडला आहे. मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडलेली ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. विरण बाजार परीसरात भरवस्थीत बिबट्याचा वावर वाढल्यामुळे परीसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुंबईत अंगणात बसलेल्या महिलेवर बिबट्याचा हल्ला बिबट्याने घराच्या अंगणात बसलेल्या महिलेवर हल्ला केल्याची घटना सप्टेंबर महिन्यात मुंबईत घडली होती. सुदैवाने या हल्ल्याच महिलेचा जीव बचावला आहे. दरम्यान या हल्ल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. बिबट्याच्या हल्ल्यामुळे परिसरात भय परसलं होतं. या पूर्वी 4 वर्षांच्या रोहितवर एका बिबट्याने हल्ला केला होता. यामध्ये रोहितच्या वडिलांनी बिबट्याला हाकलून लावले. त्यामुळे आरे कॉलनीत राहणाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. बुधवारी (29 सप्टेंबर) झालेल्या हल्ल्याच्या व्हिडीओ समोर आला होता. या व्हिडीओत दिसत होते की, एक महिला घराच्या अंगणात बसली आहे. याचवेळी मागून बिबट्याच्या डोळे चमकताना दिसत आहे. बिबट्या मागून महिलेवर हल्ला करतो. महिला स्वत:चा जीव वाचवण्यासाठी आरडाओरडा सुरू करते. यावेळी तिच्या हातात काठी असते आणि ती ही काठी बिबट्यावर उगारू लागते. त्यामुळे बिबट्या जरा मागे होते. दरम्यान बिबट्या तेथून पळ काढतो. तेवढ्यात घरातील मंडळी बाहेर येतात.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Cctv footage, Leopard, Pune

पुढील बातम्या