Home /News /pune /

पुण्याचा प्रामाणिक लॉन्ड्री चालक; इस्त्रीसाठी दिलेल्या कोटमध्ये मिळाले 6 लाखांचे दागिने केले परत

पुण्याचा प्रामाणिक लॉन्ड्री चालक; इस्त्रीसाठी दिलेल्या कोटमध्ये मिळाले 6 लाखांचे दागिने केले परत

पुणे: इस्त्रीसाठी आलेल्या कोटमध्ये मिळाले लाखोंचे दागिने, लॉन्ड्री चालाकाने पाहताच केलं असं काही की...

पुणे: इस्त्रीसाठी आलेल्या कोटमध्ये मिळाले लाखोंचे दागिने, लॉन्ड्री चालाकाने पाहताच केलं असं काही की...

पुण्यातील एका दाम्पत्याने नेहमीप्रमाणे आपले कपडे इस्त्रीसाठी लॉन्ड्रीमध्ये दिले. ज्यावेळी लॉन्ड्री चालकाने ते कपडे तपासले तेव्हा त्यात चक्क लाखोंचे दागिने मिळाले.

पुणे, 28 जानेवारी : हरवलेली वस्तू पुन्हा मिळणार नाही असेच अनेकांना वाटत असते. पण पुण्यातून एक वेगळीच बातमी समोर आली आहे. एका लॉन्ड्री चालकाने तब्बल लाखो रुपये किंमत असलेले दागिने (Gold ornaments) ग्राहकाला परत केले आहेत. लॉन्ड्री चालकाच्या या प्रामाणिकपणाचं सर्वत्र कौतुक होत आहे. (Pune laundry man return valuable gold ornaments worth rs 6 lakh to consumer) नेमकं काय घडलं? सोन्याच्या दागिने चोरीच्या दररोड घटना घडत आहे. मात्र, सोन्याच्या प्रलोभनाला बळी न पडता प्रामाणिकपणे सोन्याचे मंगळसूत्र, अंगठी, गळ्यातील हार असा सुमारे सहा लाखरुपयांचे दागिने परत करून अमराठी लॉन्ड्री चालकाने प्रमाणिकपणाचे दर्शन घडविले. रविवारी (24 जानेवारी) इस्त्रीसाठी कपडे दिल्यानंतर मंगळवारी (25 जानेवारी) इस्त्री करताना कोटाच्या खिशामध्ये दागिने आढळून आल्याचे लॉन्ड्रीचालकाने सांगितले. दागिने मिळाल्याचं कळताच... शुभलक्ष्मी ड्रायक्लीनिकचे लॉन्ड्री चालक राजमल कनोजिया (वय 28, रा. हांडेवाडी रोड, न्हावलेनगर, पुणे) याने सांगितले की, व्यंकटेश सोसायटीमधील अशोक कनोजिया यांनी रविवारी कपडे इस्त्रीसाठी दिल्यानंतर मंगळवारी इस्त्री करताना कोटाच्या खिशामध्ये सोन्याचे दागिने आढळून आले. सोन्याच्या दागिन्यांचे पाकिट बाजूला काढून कपड्याला इस्त्री केल्यानंतर त्यांना घरी नेऊन दिले. त्यावेळी ते सोन्याचे दागिने मिळत नसल्याने हतबल झाले होते. त्यांना कपड्यासह सोन्याचे दागिने दिल्यानंतर त्यांनी जीव भांड्यात पडल्याचे सांगितले. वाचा : परीक्षेत अपात्र ठरलेल्या तब्बल 7800 परीक्षार्थींना पैसे घेऊन केलं पास, पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड घरात लग्न कार्य असल्याने बहीण आली होती, तिचे दागिने माझ्या खिशामध्ये ठेवले मात्र, ते सापडत नसल्याने मागिल आठवड्यापासून आम्ही शोधत असल्याचे अशोक कनोजिया यांनी सांगितले. दागिने मिळाल्याने त्यांनी आभार मानले आणि प्रामाणिकपणाचे कौतुक केले. त्यानंतर प्रजासत्तादिनी (26 जानेवारी) व्यंकटेश सोसयाटीमध्ये लॉन्ड्री चालक राजमल कनोजिया सत्कार करून सोसायटीसह परिसरातील नागरिकांनी कौतुक केले. दागिने घेऊन करायचे काय? सहा लाख रुपयांचे दागिने घेऊन माझा संसार सुखाचा होणार नाही आणि मला समाधान मिळणार नाही. प्रामाणिकपणा ही आयुष्याची मोठी कमाई आहे. मागिल तीन वर्षांपासून लॉन्ड्री व्यवसाय करीत असून, परिसरातील सोसायट्यातून कपडे आणून इस्त्री आणि ड्रायक्लीन करून देत आहे. आतापर्यंत कोणाच्या पैशालाही धक्का लावला नाही. कष्टाची कमाईच समाधान देते असे लॉन्ड्री चालक राजमल कनोजिया याने सांगितलं.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Pune

पुढील बातम्या