Home /News /pune /

पुणे जिल्ह्यात भीषण अपघात; घाटात दुचाकीला धडक दिल्यानंतर ट्रक पलटला

पुणे जिल्ह्यात भीषण अपघात; घाटात दुचाकीला धडक दिल्यानंतर ट्रक पलटला

हा अपघात इतका भीषण होता की दुचाकीला धडक दिल्यानंतर मालवाहतूक ट्रक पलटी झाला.

खेड, 23 ऑगस्ट : पुणे-नाशिक महामार्गावरील खेड घाटात आज दुचाकी व मालवाहतूक करणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. दुपारच्या सुमारास झालेल्या या अपघातात दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात इतका भीषण होता की दुचाकीला धडक दिल्यानंतर मालवाहतूक ट्रक पलटी झाला. तसंच दुचाकीवरील दोघे खाली पडून जखमी झाले. या दोघांनाही राजगुरुनगर पोलिसांच्या मदतीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. घाट परिसरात सतत पाऊस पडत आहे. त्यामुळे अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचं चित्र आहे. जेसीबी आणि क्रेनची घ्यावी लागली मदत अपघातात मालवाहतूक ट्रक पलटी झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तासाभराने ही वाहतूक सुरळीत करण्यात पोलिसांना यश आले. खेड घाटातील अपघात दिवसेंदिवस वाढतच असल्याने वाहतुककोंडींचे मोठे संकट उभे राहत आहे. त्यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढत आहे. एक जेसीबी व क्रेनच्या मदतीने मालवाहतूक ट्रकला बाजूला सारून पुन्हा वाहतूक सुरळीत करण्यात पोलिसांना यश आले आहे. दरम्यान, घाटामध्ये अपघातानंतर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी खेड घाटातील बाह्यवळण मार्गाचे काम लवकरात लवकर व्हावे अशी मागणी या परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Pune news

पुढील बातम्या