मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

पुण्यात पुन्हा खळबळ, KEM रुग्णालयाच्या खिडकीतून उडी मारत महिलेने केली आत्महत्या

पुण्यात पुन्हा खळबळ, KEM रुग्णालयाच्या खिडकीतून उडी मारत महिलेने केली आत्महत्या

शहरातील केईएम रुग्णालयाच्या खिडकीतून उडी मारून एका महिलेनं आपलं जीवन संपवलं आहे.

शहरातील केईएम रुग्णालयाच्या खिडकीतून उडी मारून एका महिलेनं आपलं जीवन संपवलं आहे.

शहरातील केईएम रुग्णालयाच्या खिडकीतून उडी मारून एका महिलेनं आपलं जीवन संपवलं आहे.

पुणे, 22 जून : गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात आत्महत्येच्या एकामागोमाग एक अशा घटना घडू लागल्या आहेत. यातील बहुतांश घटना या कौटुंबिक कारणातून घडल्याचं समोर आलं. अशातच आता पुण्यातील आत्महत्येची आणखी एक घटना समोर आली आहे. शहरातील केईएम रुग्णालयाच्या खिडकीतून उडी मारून एका महिलेनं आपलं जीवन संपवलं आहे. पुण्यातल्या केईएम हास्पिटलच्या खिडकीतून उडी मारून महिलेनी आज सकाळी आत्महत्या केली. मुलगा किडनीच्या विकारांनी त्रस्त होता. त्या नैराश्यातून सदर महिलेने आत्महत्या केल्याची पोलिसांना शंका आहे. मात्र याबाबतच नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. 5 दिवस आणि 10 आत्महत्या, पुण्यात नेमकं चाललंय काय? आर्थिक ओढाताण कौटुंबिक वाद, नैराश्य अशा अनेक घटकांमुळे पुणे परिसरात आत्महत्येचे प्रकार वाढू लागले आहेत.आज पहाटे केईएम हॉस्पिटलच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून महिलेने आत्महत्या केली होती. याआधी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत संपूर्ण कुटुंबातील चार जणांनी आत्महत्या केली होती. त्यात पतीपत्नी आणि दोन मुलांची आर्थिक ओढाताणीमुळे आत्महत्या केल्याचं समोर आलं होतं. सिंहगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत वॉचमनने आत्महत्या केली होती. पिंपरी चिंचवडच्या वाकड परिसरात नोकरीवरून काढून टाकल्याच्या ताणातून दोन तरूणांची आत्महत्या केल्याची घटना घडली होती. तर समर्थ पोलीस स्टेशनच्या हद्दीत पती पत्नीने आत्महत्या केल्याचं पुढे आलं होतं. वारजे पोलीस ठाण्याच्या हद्दीत डुक्करखिंडीतून उडी नारून महिलेने आत्महत्या केली होती. तिच्या पतीने आठ दिवसापूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. 19 जून रोजी पुण्यात सामूहिक आत्महत्येनं मोठी खळबळ उडाली होती. एकाच कुटुंबातील चार जणांनी गळफास घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. सुखसागरनगर परिसरातील वाघजाईनगरात राहणाऱ्या कुटुंबानं टोकचं पाऊल उचलत आयुष्य संपवलं. अतुल दत्तात्रय शिंदे, पत्नी जया शिंदे यांच्यासह 6 आणि 3 वर्षांची त्यांची दोन लहान मुलांचा सामावेश आहे.
First published:

Tags: Pune crime, Pune news

पुढील बातम्या